बांधकाम मटेरीयल होलसेल दरात पुरविण्याचे आमिष दाखवून शिरपूर येथील बांधकाम व्यावसायिकाला १४ लाख १३ हजार ६० रुपयांत गंडविल्याची घटना घडली. याप्रकरणी नंदुरबारातील एकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील पटेल वाडी येथील जुबेरअली युनूस अली सैय्यद याने शिरपूर येथील बांधकाम व्यावसायिक चेतन वसंत धामणे यांना बांधकाम मटेरीयल होलसेल दरात पुरवण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार दि. ४ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२१ दरम्यान १४ लाख १३ हजार ६० रुपयांची ऑर्डर धामणे यांनी त्याला दिली. सदर रक्कम युनीयन बँकेच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली. परंतू मटेरीयल पुरविले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धामणे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार जुबेर सैय्यद याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवीदास सोनवणे करीत आहेत.