Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी तळोदा प्रकल्प राबविणार चला मुलांनो शाळेत चला उपक्रम

Mahesh Patil by Mahesh Patil
August 7, 2021
in शैक्षणिक
0
तळोदा | प्रतिनिधी
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शाळेत येणासाठी चला मुलांनो शाळेत चला अशी मोहिम राबवा. यासोबतच शाळा सुरू करण्यासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय अनुदानित एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल असलेल्या ग्रामपंचायतींना विशेष ग्रामसभा घेऊन ठराव देण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी दिल्या आहेत.
      दि. २६ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार इयता ८ वी ते १२ पावेतो शाळा सुरू करणेबाबत नियोजन व सूचना देणे संदर्भात तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात प्रकल्पस्तरीय शाळा व्यवस्थापन समितीची बैठक उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत सहायक प्रकल्प अधिकारी सुवर्णा सोलंकी, मुख्याध्यापक सी.एम.पाटील, ग्रामसेवक आर.ए.पावरा, सलसाडी मुख्याध्यापक के.एस.पाटील, राणीपूर सरपंच सुशीला वळवी, सलसाडी सरपंच विद्या ठाकरे, लोभानी ग्रामसेवक पी.डी.खाडे,  सहायक प्रकल्प अधिकारी शिक्षण एस.एम.चौधरी, के.सी.कोकणी, शिक्षण विस्तार अधिकारी बी.एम.कदम, बी.आर.मुंगळे, हापसिंग मोरे आदीसह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अनुदानित व शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक, ग्रामसेवक, सरपंच आदी उपस्थित होते.
         या बैठकीत ग्रामसेवक व सरपंच यांना गावातील विद्यार्थ्याना कोरोनाचे नियम पालन करून इयता ८ वी १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत नियमित येण्यासाठी आवाहन करावे, शिक्षण सेतू अंतर्गत शिकविण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांना सहकार्य करणे, विद्यार्थ्यांना कोरोना बाबत मार्गदर्शन व जनजागृती करणे पालकांना समुपदेशन करून विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत आवाहन करणे, शाळा सुरू करणेपूर्वी विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने चला मुलांनो शाळेत चला अशी मोहिम राबविण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी डॉ.घोष यांनी दिल्या. गावात दवंडी पिटवून आश्रमशाळा सुरु झाल्याबाबत पालक व विद्यार्थी यांना माहिती द्यावी, शाळा सुरू करणे संदर्भात विशेष ग्रामसभा आयोजित करून ठराव देण्यासाठी सहकार्य करावे, यासोबतच २ ऑगस्ट पासून स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जनजागृती कार्यक्रमात ग्रामपंचायत समिती व ग्रामसेवक यांनी मुख्याध्यापक व शाळेत सहकार्य करावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी केले.
        विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालक यांच्या जनजागृती करणे. आश्रमशाळांना ग्रामपंचायतीने विशेष मदत करावी असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले. यासोबतच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला, रहिवासी दाखला आदी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे ग्रामसेवक, तलाठी, मुख्याध्यापक यांनी समन्वय साधून सहकार्य करावे अशा सूचना घोष यांनी दिल्या तर बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने आवश्यक पूर्व तयारी करणेबाबत देखील चर्चा करण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

बांधकाम व्यावसायिकाला १४ लाखात फसविलेल,नंदुरबारातील एकाविरुद्ध गुन्हा

Next Post

नंदुरबार नगरपालिकेने आता मोकाट गुरे पकडण्याची मोहिम घेतली हाती, पहिल्या दिवशी १८ गुरे पकडली

Next Post
नंदुरबार नगरपालिकेने आता मोकाट गुरे पकडण्याची मोहिम घेतली हाती, पहिल्या दिवशी १८ गुरे  पकडली

नंदुरबार नगरपालिकेने आता मोकाट गुरे पकडण्याची मोहिम घेतली हाती, पहिल्या दिवशी १८ गुरे पकडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group