नंदुरबार ! प्रतिनिधी
दि.१५ ऑगष्ट भारतीय स्वातंत्र्य दिनी महावितरण कंपनीच्या वाढीव वीज बिल आकाराच्या विरोधात शहादा तहसील समोर सामुहिक रित्या आत्मदहन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.
याबाबतचे निवेदन शहादा येथील म.रा. वी.वितरणच्या कार्यकारी अभियंता यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना मुळे लॉकडाऊन गेल्या वर्षी पासुन सुरू आहे . त्यामुळे नागरिकांचा रोजगार बुढाला आहे . लॉकडाऊनच्या काळात विज मिटर रिडींग वेळेवर घेतले नाही . मात्र रिडींग अवेळी घेतले जात असुन एक ठोक वीज बिल नागरिकांच्या माथी मारले जात आहे . त्यामुळे सामान्य नागरिकांना ह्या विज बिलाचा भुर्दंड सोसावा लागत आहे . वीज बिल सुट देणार अशी घोषणा राज्य सरकारने केली होती . मात्र नागरीकांच्या विज बिलात कोणतीही सुट दिलेली नाही . उलट वाढीव लाईट बिल पाठवुन त्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे . सदर वाढीव लाईट बिल ग्राहकाने न भरल्यास आपल्या स्तरावरून हुकूम शाहीने ग्राहकांचे विज कनेक्शन कट केले जात आहे . विज वितरण कंपनीने सुरू केलेल्या या हुकूमशाही पध्दतीचा आम्ही निषेध करत आहोत . सामान्य ग्राहकांना वाढीव विज बिल देवुन त्यांची गळचेपी केली जात आहे . परंतु सामान्य कोणतीही पुर्व सुचना न देता वीज पुरवठा खंडीत केला जातो . या भारतीय स्वातंत्र्यदिनी जुलमी कारभारा विरोधात पिपल्स रिपब्लिकन पाटी तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर दि. १५ ऑगष्ट रोजी शहादा तहसिल कार्यालयाच्या आवारात आम्ही २०० महिला व पुरूष सामुहिक रित्या आत्मदहन करणार आहोत .सामान्य जनतेचे वाढलेले आर्थिक शोषणाच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन पक्षातर्फे करणार आहोत . तरी विज वितरण कंपनीने आमच्या निवेदनाच्या विचार करून थकित विज बिल , वाढीव विज बिल ग्राहकांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा त्या बाबत विचार न झाल्यास आम्ही दि. १५ ऑगष्ट भारतीय स्वातंत्रदिनी सामान्य ग्राहकांच्या हितार्थ आत्मदहन करू व होणाऱ्या परिणामास विज वितरण कंपनी जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी . सामान्य जनतेचे वाढलेले आर्थिक शोषणाच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन पक्षातर्फे करणार आहोत . तरी विज वितरण कंपनीने आमच्या निवेदनाच्या विचार करून थकित विज बिल , वाढीव विज बिल ग्राहकांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा त्या बाबत विचार न झाल्यास आम्ही १५ ऑगष्ट भारतीय स्वातंत्रदिनी सामान्य ग्राहकांच्या हितार्थ आत्मदहन करू व होणाऱ्या परिणामास विज वितरण कंपनी जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी . असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विक्की मोरे , नंदुरबार जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब पाटील , जिल्हा उपाध्यक्ष इम्रान मेमन, शहादा तालुका अध्यक्ष रवींद्र शिरसाठ, तालुका उपाध्यक्ष रमेश निकुंभे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.