Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ. रणजित पावरा यांना राज्यस्तरिय “आरोग्य भुषण” पुरस्कार प्रदान.

team by team
April 18, 2022
in राज्य
0
डॉ. रणजित पावरा यांना राज्यस्तरिय “आरोग्य भुषण” पुरस्कार प्रदान.

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. रणजित पावरा यांना सह्याद्री उद्योग समूह, मुंबई व न्युज लाईन मिडिया, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर नरीमन पाँईट मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री मा.आ.डॉ. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.


भारतासह संपूर्ण जगच कोरोना महामारीच्या भीषण संकटात सापडले असतांना कोरोना विषाणूच्या लढाईत डॉक्टर सर्वात पुढे होते. रुग्णांना महामारीतून वाचवण्यासाठी स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र संघर्ष करून अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ .पावरा यांचे विशेष महत्त्वपूर्ण योगदान राहिले होते. याची दखल घेऊन त्यांना काल मुंबई येथे राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी विधानपरिषद सदस्य तथा संस्थापक शिवसंग्राम पक्ष आ.विनायक मेटे, आ.निलेश लंके, पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे, आ.संदिपजी थोरात, नवनाथ घुगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. डॉ. पावरा यांच्या कार्यकर्तुत्वाची दखल घेऊन राज्यस्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

“अंगावर पीपीई कीट चढविली की,अंगाला दरदरून घाम फुटतो, पाणी पिता येत नाही. काही परिचारिका व डॉक्टर एवढेच विश्व बनते. दिवसभर विषाणूच्या विळख्यात असल्याने बाहेर पडल्यावर आपल्यामुळे कुटुंबातील व्यक्ती, मित्रांना, संसर्ग होणार तर नाही ना ? अशी भावना घर करून होती. स्वतः ची लहान मुले, पत्नी, घरातील वयस्कर व्यक्ती यांच्या पासून अलिप्तता ठेवणे अपरिहार्य होते. काळ खूप कठीण होता. रूग्णसेवेसाठी हा एक त्यागच म्हणावे लागेल. हा पुरस्कार मिळाल्याने सामाजिक जबाबदारी वाढली आहे.”
डॉ. रणजित पावरा
बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय,नंदुरबार.

बातमी शेअर करा
Previous Post

ढंढाणे- रनाळे दरम्यान भरदुपारी दुचाकीस्वाराला मारहाण करून सव्वा दोन लाख चोरट्यांनी लांबविले

Next Post

जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीला मोठ्या संख्येने भाविकांना येण्याचे आवाहन

Next Post
जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीला मोठ्या संख्येने भाविकांना येण्याचे आवाहन

जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीला मोठ्या संख्येने भाविकांना येण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add