नंदुरबार ! प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या सब स्टेशनचा उजव्या बाजूस पत्र्याच्या शेड मध्ये जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून एक लाख ४३ हजार १५० रुपयांचा विविध ऐवज जप्त करुन चार आरोपींविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंगखेडा शेल्टी रस्त्यावर गावानजीक एका पत्र्याच्या शेडमध्ये झन्ना मन्ना पत्त्यांचा जुगार चालत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ धाड टाकली त्यात काही जण जुगार खेळत असल्याने त्यांना पकडण्यात आले यांच्याकडून ३१ हजार ८५० रुपये रोख,२८ हजार किमतीचे चार मोबाईल,७७ हजार रुपये किमतीचा चार मोटारसायकल,जुगाराची साधने असा एकूण एक लाख ४३ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून इंद्रीस खान युनूस खान पठाण रा. हरियाली इस्टेट शहादा,संतोष जानकिराम मराठे रा.डाबरी,दोंडाईचा,संभाजी विठ्ठल पाटील रा. शिरडाने ता. जि. धुळे,भोलेश्वर प्रभाकर गिरासे रा. होळनांथे,ता. शिरपूर यांचा विरुद्ध सारंखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.