Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हाटमोहिदा येथे शॉर्ट सर्किटमूळे लागलेल्या आगीत सहा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक,शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा इशारा

team by team
March 13, 2022
in कृषी
0
हाटमोहिदा येथे शॉर्ट सर्किटमूळे लागलेल्या आगीत सहा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक,शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा इशारा

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील हाटमोहिदा येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा सुमारे सहा एकर क्षेत्रातील ऊस खाक झाला आहे. याप्रकरणी महावितरणकडून पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.दरम्यान शेतकऱ्याने भरपाई न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदा येथे काल दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास हाटमोहिदा शिवारात नाशिंदा गावाच्या कमानीजवळील ऊसाच्या शेताला आग लागली. यामध्ये गिरधर गोरख पाटील व युवराज राजाराम पाटील या दोन्ही शेतकऱ्यांचा मिळून सुमारे सहा एकर ऊस आगीत जळून खाक झाला. गिरधर पाटील यांच्या शेतात असलेल्या ११ के.व्ही. हाटमोहिदा वाहिनीच्या लोखंडी पोलवर स्पार्किंग झाल्यामुळे ऊसाला आग लागली. वाऱ्यामुळे आग पसरत थेट सुमारे सहा एकरमध्ये पसरुन ऊसाची राख झाली आहे. यावेळी ३३/११ के.व्ही. कोपर्ली उपकेंद्रातून निघणारा ११ के.व्ही. हाटमोहिदा वाहिनीचा विद्युत पुरवठा सुरु होता. यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग पसरत जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महावितरणच्या कनिष्ठ अभियंता श्रीमती मोरे यांच्यासह वायरमन सागर चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन महावितरणतर्फे पंचनामा केला आहे. यावेळी उमाकांत चौधरी, युवराज पाटील, प्रशांत पाटील, गजराजसिंग जमादार, योगेश पाटील, वसंत कोळी उपस्थित होते.
शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा सुमारे सहा एकर क्षेत्रातील ऊस खाक झाला आहे. याप्रकरणी महावितरणकडून पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चिपलीपाडा येथे भिलिस्थान लायनसेनेचा मान्यवरांच्या उपस्थितीत फलक अनावरण

Next Post

रांझणी शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी 

Next Post
रांझणी शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी 

रांझणी शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add