Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापर येथे दोन गटात हाणामारी,तिघे जखमी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
March 13, 2022
in क्राईम
0
बिलगाव येथे महिलेस लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात भांडणातून दोन गटात हाणामारी झाली. यात बियरच्या बाटलीने दोघांना मारहाण करण्यात आल्याने दोन्ही गटातील तिघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील गुलीउंबर येथील आकाश शांताराम वळवी व तुषार गोविंद वळवी हे दोघे खापर गावातील यात्रेतून घरी जात होते. यावेळी मोठा उदेपूर गावातील चौघांमध्ये सुरु असलेल्या भांडणादरम्यान नितीन सावंत वसावे याने फेकून मारलेला दगड आकाश वळवी याच्या कपाळाला लागून दुखापत झाली. याबाबत आकाश वळवी व तुषार वळवी यांनी जाब विचारला असता नितीन वसंत वसावे, अरुण सरदारसिंग वसावे, जयदिप रविंद्र वसावे तिघे रा.छोटा उदेपूर ता.अक्कलकुवा व हेमंत ब्रिजलाल वसावे रा.काकडखुंट ता.अक्कलकुवा या चौघांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच तुषार वळवी यांना नितीन वसावे याने बियरची बाटली डोक्यात मारुन दुखापत केली. याबाबत आकाश वळवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३३६, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जयदिप रविंद्र वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, खापर येथील यात्रेत शरद दिलीप वसावे, अश्विन राजेश वसावे व गुलीउंबर येथील महेश करमसिंग वसावे यांचे आपसात भांडण सुरु होते. सदर भांडण सोडविण्यासाठी जयदिप वसावे गेले असता महेश करमसिंग वसावे याने काचेच्या बाटलीने कपाळावर मारुन दुखापत केली. तसेच जयदिप यांचा मित्र हेमंत ब्रिजलाल वसावे यांना सुभाष शिवाजी वळवी, राकेश नानसिंग वळवी यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत जयदिप वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्ककलुवा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post

पाचोराबारी व खापर गावातून तीन दुचाकी लंपास

Next Post
बिलगाव येथे महिलेस लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पाचोराबारी व खापर गावातून तीन दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add