नंदुरबार ! प्रतिनिधी
भारतीय महिलांच्या सहकार्याने मूळच्या नंदुरबार येथील पूर्वाजंली जोशी यांनी दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाग्रस्त कुटुंबांची क्षुधा भागविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. पूर्वाजंली जोशी या नंदुरबार मर्चंट बँकेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास पाठक यांच्या सुकन्या आहेत. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
भारतीयांच्या सेवा वृत्तीला जगात तोड नाही असं बोलले जातं. व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर कुठेही भारतीय माणूस गेला तरी भारतीय वसुधैव कुटुम्बकम या संकल्पनेतून सेवा कार्यासाठी नेहमीच तत्पर असतात. सध्या दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या तिसर्या लाटेची तीव्रता वाढली असून कडक लॉकडॉउन सुरू आहे. या काळात राजधानी जोहान्सबर्गमध्ये कोरोना बाधित व्यक्तींच्या कुटुंबांना बाहेर पडणे कठीण असताना त्यांच्यासाठी घरपोहोच भोजनाची निशुल्क सेवा पुरविण्याची सामाजिक जबाबदारी ही भारतीय महिलांनी स्वीकारली आहे. पंधरा जणांच्या या टींमध्ये पाच महिला समन्वयक असून नंदुरबार येथील पूर्वाजंली जोशी या नेतृत्व करीत आहेत. नंदुरबार माहेर आणि धुळे सासर असलेल्या पूर्वाजंली जोशी या पती प्रशांत जोशी ग्राम पत्ते मुलगा व मुलगी यांच्यासोबत जोहान्सबर्गमध्ये सध्या वास्तव्यास आहेत. महिन्याभरापूर्वी पूर्वाजंली जोशी यांनी त्यांच्या घरा शेजारील दोन कोरोना ग्रस्त कुटुंबांचे भोजनाची पार्सल पुरवणे पासून या सेवेला प्रारंभ केला. या उपक्रमात रुग्ण असलेल्या कुटुंबास घरपोच एक वेळचे भोजन पुरवली जात आहे. त्यात वरण, भात, पोळ्या, भाजी, सलाड, फळ, विशेषता विटामिन सी चे संत्री-मोसंबी, ग्रीन टी चे पाकीट दिले जात आहे. लॉकडॉउनमुळे रात्रीचे जेवण वितरित करणे शक्य नसल्याने दुपारच्या जेवणात थोडे जास्तीचे पदार्थ देण्यात येत आहे. दररोज २०० पाकिटांची व्यवस्था या उपक्रमात भारतीय महिलांनी गरजु कुटुंबांकडून मागणी वाढल्याने महिन्याभरापासून ही सेवा सुरु केली आहे यात दररोज २०० पाकीट घरपोच पोहोचविल्या जात आहेत. केवळ भारतीय कुटुंब नव्हे तर दक्षिण आफ्रिका व अन्य देशांमधील कुटुंबियांसाठी ही सेवा महिला पुरवीत आहेत. भारतीयांच्या विविध उपक्रम कार्यक्रमांची या ठिकाणी इंडिया क्लब म्हणून ओळख आहे. या सेवा कार्याची माहिती झाल्यानंतरच लगेच त्यांना मदतीचा हात दिला. पूर्वाजंली जोशी यांच्यासोबत प्राची गुप्ता, रश्मी हरिपाठ, हर्षदा सिद्धपूर, स्मृती त्रिवेणी, निशी, ज्योती, शिना व टिना आदी महिला या सेवा कार्यात योगदान देत आहेत. यामुळे त्यांच्या सेवाकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.