Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राकसवाडे येथे १४३ जणांना विषबाधा, अधिकारी व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे परिस्थिती नियंत्रणात

team by team
March 2, 2022
in आरोग्य
0
राकसवाडे येथे १४३ जणांना विषबाधा, अधिकारी व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे परिस्थिती नियंत्रणात

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे येथे ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रसारातून १४३ जणांना विषबाधा झाल्याची घटना काल दि. १ मार्च रोजी विषबाधा झालेल्या नागरीकांना आरोग्य विभागाच्या पथकाने तात्काळ त्याचठिकाणी उपचार केल्याने परिस्थिती नियंत्रणात असून सर्व रूग्णांना सोडण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल दि.१ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त राकसवाडे येथे ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. महाप्रसाद वाटपानंतर काही ग्रामस्थांना सायंकाळी उटल्या होवू लागल्या. हळु हळु उलटल्या होणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली. यामुळे अनेकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. उलटल्या होणार्‍या रूग्णांच्या संख्येत प्रसादातून विषबाधा झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला. राकसवाडा येथे ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे समजताच नंदुरबार येथून भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी जाफर तडवी हे प्रथकासह दाखल झाले. त्यांनी लागलीच इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती देवून प्राचारन केले. यावेळी गावातील १४३ जणांवर उपचार करण्यात आला. रात्री अडीच वाजेच्या सुमारास शेवटचा रूग्णास उपचार करून सोडण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.जाफर तडवी, डॉ.अजय विचुंरकर, डॉ.उर्वशी वळवी, जितेंद्र सोनानी, डॉ.अमित पटेल, डॉ.मनिष नांद्रे, डॉ.राकेश पाटील, विजय कंणखर, रघुनाथ पाटील, युवराज भटवार, गणेश खेडेकर, एस.टी.वाघ, जि.पी.वाघ, जे.जे. आखाडे, श्रीमती अमृता पाटील, श्रीमती अलका मराठे, श्रीमती महिमा गावीत, निंबा राजपूत आदींच्या आरोग्य पथकाने वेळीच दखल घेतल्याने राकसवाडा येथे मोठा अनर्थ टळला. विषबाधा झालेल्या नागरीकांना तेथेच सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल प्रशासनाने आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. दरम्यान आज अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी राकसवाडा येथे जावून नमुना घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

सुसरी धरण वळण रस्ता दुरुस्तीसाठी ३ मार्च रोजी शेतकरी व भाजपा किसान मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलन

Next Post

पालिकेत करवसूली संदर्भात आयोजित बैठकीत मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांना नेमक्या कोणत्या अधिकाराने निमंत्रित केले : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

Next Post
जिल्ह्यात भाजपातर्फे आज अंडरवर्ल्ड डॉनच्या करण्यात येणार पुतळा दहन : जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

पालिकेत करवसूली संदर्भात आयोजित बैठकीत मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांना नेमक्या कोणत्या अधिकाराने निमंत्रित केले : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add