Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालिकेत करवसूली संदर्भात आयोजित बैठकीत मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांना नेमक्या कोणत्या अधिकाराने निमंत्रित केले : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

team by team
March 2, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यात भाजपातर्फे आज अंडरवर्ल्ड डॉनच्या करण्यात येणार पुतळा दहन : जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोनाने होरपळलेल्या नागरिकांकडून सक्तीची कर वसूली करुन नागरिकांना आत्महत्येस भाग पाडण्यासारखे आहे.यामुळे वसूली करतांना जनतेच्या परिस्थितीचा विचार करण्यात यावा. मुंबई पॅटर्न वापरुन कर माफ करण्यात यावा, अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवितांना आधी पुनर्वसनाचा विचार करण्यात यावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.
सद्यस्थितीत पालिकेचे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कर वसूली आणि अतिक्रमणावरुन राजकारण चांगलेच तापले असून या पार्श्वभूमीवर भाजपाची भूमिका मांडण्यासाठी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी माजी आ.शिरिष चौधरी, पालिका गटनेते चारुदत्त कळवणकर यांच्यासह भाजपा नगरसेवक उपस्थित होते. यावेळी विजय चौधरी पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या ५०० स्वे.फुट जागा असणाऱ्या नागरीकांची सरसकट कर वसूली माफ करत दिलासा दिला. तो आदर्श घेवून नंदुरबार पालिकेमध्ये तसाच पॅटर्न का राबविण्याची गरज आहे. नुकतीच पालिकेत करवसूली संदर्भात आयोजित बैठकीत प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना नेमक्या कोणत्या अधिकाराने निमंत्रित केले असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला.दरम्यान, माजी आ.रघुवंशी कोणत्याही पदावर नसतांना अधिकाऱ्यांना धमकावतात,सक्तीची वसूलीचे आदेश देतात,कर थकबाकी असणाऱ्यांच्या घराबाहेर बोर्ड लावण्याचे आदेश देणे घटनाबाह्य असल्याचे चौधरी यांनी सांगितले. यावेळी माजी आ.शिरीष चौधरी यांनी पालिकेत होणारी प्रत्यक्ष कर वसूली आणि कागदोपत्री दाखविली जाणारी कर वसुली यात तफावत असल्याचा आरोप केला. तसेच शहरातील वाढलेले अतिक्रमण हटवितांना सत्ताधाऱ्यांनी स्वत:पासून सुरूवात करावी आणि मगच नागरिकांचे अतिक्रमण काढण्याचे सांगितले. दरम्यान, प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसिलदार यांनी घटनाबाह्य बैठक घेतल्याने त्यांच्यावर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

राकसवाडे येथे १४३ जणांना विषबाधा, अधिकारी व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे परिस्थिती नियंत्रणात

Next Post

होय विजुभाऊ मीच चंद्रकांत रघुवंशींना वसुली विभागाचा बैठकीला सन्मानपूर्वक आमंत्रित केले : प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे

Next Post
होय विजुभाऊ मीच चंद्रकांत रघुवंशींना वसुली विभागाचा बैठकीला सन्मानपूर्वक आमंत्रित केले :  प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे

होय विजुभाऊ मीच चंद्रकांत रघुवंशींना वसुली विभागाचा बैठकीला सन्मानपूर्वक आमंत्रित केले : प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add