शहादा l प्रतिनिधी
शहरातील दोंडाईचा रस्त्यावर मुख्य प्रवेशद्वारासमोर अज्ञात चोरट्यांनी 16 फेब्रुवारी च्या मध्यरात्री पत्रे वाकवून आत प्रवेश करून सुमारे साठ हजार रुपये रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली आहे.नंदुरबार येथून घटनास्थळी ठसे तज्ञांनी भेट देऊन पाहणी केली.
पहिली घटना चोरट्यांनी महाविर ऑटोमोबाईल्स स्पेअरपार्टचा दुकानात चोरट्यांनी प्रवेश केला.टेबलला असलेले ड्रावर तोडून त्यात असलेले रोक साठ हजार रुपये लंपास केले.एवढ्यावरच न थांबता स्पेअर पार्ट च्या दुकानात वस्तू इतरस्त फेकून शोधाशोध केली असल्याचे निदर्शनास आले आहे.एवढ्यावरच न थांबता त्यांनी लागलीच चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारीच लागून असलेल्या एम.पी.जनरल स्टोअर्स कडे वळवला.जनरल स्टोअर्स मध्ये प्रवेश करून चोरट्यांनी पैशांची शोधाशोध केली.जनरल स्टोअर्स मध्ये चोरट्यांना पैसे मिळाले नाहीत.काही वस्तू लंपास केल्याचे सांगण्यात आले.एकाच रात्रीतून दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सकाळी दुकाने उघडी केल्यानंतर ही घटना निदर्शनास आली.घटनेची माहिती लागलीच पोलिसांना देण्यात आली.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन दोन्ही दुकानांची पाहणी केली.उशिरा नंदुरबार येथून ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.ठसे तज्ञांनी ठशांची नमुने घेतले शिवाय दुकानात लावलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे देखील पाहण्यात आले.विजय जैन व शब्बीर हुसेन या दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात घरफोडीच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.