Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीत ५ से.मी.सूट देण्याची ट्रायबल फोरमची मागणी

team by team
February 18, 2022
in राजकीय
0
लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीत ५ से.मी.सूट देण्याची ट्रायबल फोरमची मागणी

म्हसावद l प्रतिनिधी
राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीत ५ से.मी.सूट देऊन उंचीतील फरक दूर करण्याबाबतचे निवेदन अक्कलकुवा तहसिलदार मार्फत सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने संघ लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरण्यात येणाऱ्या भारतीय पोलीस सेवा ,भारतीय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स गट अ, आणि इतर केंद्रीय पोलीस सेवा अंतर्गत होणाऱ्या गट अ आणि गट ब च्या पदभरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणी मध्ये १६५ से.मी. उंची अनिवार्य केलेली आहे.परंतू यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवार पुरुषासाठी १६० से.मी.व महिला साठी १४५ से.मी. अशी दोघांनाही पात्रतेसाठी ५ से.मी.ची सूट दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्यात राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पोलीस उपअधिक्षक /सहायक पोलीस आयुक्त,अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक अधिकारी अशा विविध पदासाठी सुद्धा केंद्र सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर १६५ से.मी.उंची अनिवार्य केलेली आहेत.
मात्र संघ लोकसेवा आयोगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उंचीत ५ से.मी.सूट दिलेली आहे.परंतू राज्य लोकसेवा आयोगात तशी सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे थोड्याफार फरकाने अनुसूचित जमातीचे बहुतांश उमेदवार राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या शारीरिक क्षमता चाचणीत अपात्र ठरतात.संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांच्यात अनुसूचित जमाती उमेदवारांच्या बाबत शारिरीक चाचणीत उंची मध्ये ५ से.मी.ची स्पष्ट तफावत आहेत. ही तफावत दूर करुन संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर ,राज्य लोकसेवा आयोगातही अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पुरुष व महिला उमेदवारांना ५ से.मी.सूट देण्यात यावी.अशी माहिती नंदुरबार ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी, जिल्हा कोषाध्यक्ष वसंत वसावे,
मनिष वसावे, जितेंद्र पाडवी,अनिल वसावे,रवी पावरा, दिनेश तडवी, ,वसंत , महेश वळवी (जिल्हा प्रसिद्धीप्रमुख) आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा शहरात चोरट्यांनी दोन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला, ६० हजार लंपास

Next Post

नंदूरबार येथे गुरू रविदास जयंती उत्साहात साजरी

Next Post
नंदूरबार येथे गुरू रविदास जयंती उत्साहात साजरी

नंदूरबार येथे गुरू रविदास जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add