नंदूरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील बालाघाट येथील आदिवासी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल मानसिंग वसावे यांनी नेपाळ मध्ये माऊंट एव्हरेस्ट बेस कँम्पची मोहीम उने ३० अंश सेल्सियस तापमानात फत्ते केली.काल दि.४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते बालाघाट येथे स्वगृही परतले.दरम्यान एव्हरेस्ट बेस कँम्पची मोहीम यशस्वी केल्याबद्दल नंदुरबार येथे भारतीय किसान सेनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
टीम ३६०एक्सप्लोरचा आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी अवघड परिस्थिती मध्ये नेपाळ येथील काला पत्थर (१८.१९२ फूट) उंच शिखर असलेल्या एवरेस्ट बेस कँम्प(१७,५९८) या शिखरवर यशस्वी चढाई करून अभिमान वाटेल अशी कामगिरी केली. दि. १९ जानेवारी पासुन लुक्ला येथून मोहीमेला सुरुवात केली. जवळ जवळ ७१ किमी आणि उणे वातावरण हे ७ पासुन १४ ते उणे ३० पर्यंत होते. बर्फ पडत होता, वारे हे प्रचंड वेगाने होते या सगळ्या गोष्टी सहन करत मोहीम यशस्वी केली.ते नेपाळहुन विमानाने दिल्ली व तेथुन नाशिक व्हाया अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील स्वगृही परतले.
दरम्यान नेपाळ येथेे माऊंट एव्हरेस्ट बेस कँम्पची मोहीम उने ३० अंश सेल्सियस तापमानात फत्ते केल्याबद्दल नंदुरबार येथे भारतीय किसान सेनेतर्फे शाल व श्रीफळ देवुन भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव तथा भिल्लीस्थान लायल सेनेचे प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी यांनी सत्कार केला.यावेळी भारतीय किसान सेनेचे जिल्हा अध्यक्ष उदेसिंग पाडवी, विमुक्त भटके सेल जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव,देवला सोमा वळवी उपस्थीत होते.