Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि. प.च्या शिक्षण विभागाच्या प्रकरणे तात्काळ निघाली निकाली, शिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण यांचा करण्यात आला सत्कार

team by team
February 5, 2022
in शैक्षणिक
0
जि. प.च्या शिक्षण विभागाच्या प्रकरणे तात्काळ निघाली निकाली, शिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण यांचा करण्यात आला सत्कार

नवापूर l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके मंजूर होणेस खूप मोठा कालावधी लागत होता. संबंधित कर्मचारी हा बाहेरून उसनवार पैसे घेवून आपले वा आपल्या परिवारावर आलेल्या आरोग्य दृष्ट्या संकटाचा सामना करत असे. त्या नंतर सदर देयके खूप उशिराने मंजूर होत असे. अनेक प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करून शिक्षण विभागा मार्फत सदर देयकांचा प्रवास वाढत होत असे. सदर जाचास आपले जि.प.शिक्षक कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कंटाळले होते. व काहींनी तर वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके मागणी करणे देखील बंद केले होते.परंतु त्या नंतर डॉ.युनुस पठाण यांची नियुक्ती जिल्हा समन्वयक म्हणून केली असता, तात्काळ त्यांनी एक नविन मुख पत्र तयार करून वैद्यकीय देयकाचा अनावश्यक प्रवास कमी केला. तसेच कामाची एक विशिष्ट प्रणाली तयार करून दिली. त्या नंतर काही काळापासून सदर देयके मंजूर होण्याची प्रक्रिया ही जलद गतीने होत असले बाबत संघटनेच्या निदर्शनास आली. शिक्षण विभागातून तात्काळ प्रकरणे निकाली निघत आहेत. व त्यामुळे कर्मच्याऱ्यांचे आर्थिक संकट लवकर दुर होत असल्याचे दिसून आले. सदर वैद्यकीय देयके मंजूर झाल्याने त्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. करीता संबंधित लिपिकांचे, कार्यालयीन अधीक्षकांचे तसेच नवनियुक्त शिक्षणाधिकारी महोदय यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
आजअखेर कामे वेळेवर होत नाही म्हणून कर्मच्याऱ्यांच्या वतीने संघटना तक्रार करत असायची. परंतु आज प्रथमच प्रशासना मार्फत चांगले सहकार्य मिळत असल्याने नक्कीच संबंधित शिक्षण विभाग अभिनंदनास पात्र ठरला आहे.
डॉ.युनुस पठाण यांनी शिक्षणाधिकारी पदाचा पदभार महिन्याभरापुर्वीच स्विकारला व नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात न घडलेली निवड श्रेणी ची प्रक्रिया जलद गतीने सुरु झाली व पहिल्यांदाच त्याचा लाभ शिक्षकांना होईल. वर्गखोली बांधकाम, वर्गखोल्या निर्लेखन, NPS बाबत हिशोब, सानुग्रह अनुदान बाबत कार्यवाही, विद्यार्थी लाभाच्या योजना, गुणवत्ता विकास साठी विविध कार्यक्रम, शिक्षकांची विविध प्रलंबित प्रकरणे निकाली निघणे, तसेच विभागातील कर्मचारी यांच्याकडून प्रेमाने कामे करून घेणे, सर्वात महत्वाचे म्हणजे आलेल्या कर्मचारी व शिक्षकांशी आदराने बोलणे, अशा अनेक बाबी सध्या शिक्षण विभागात घडत असल्याचे दिसून येत आहे.आजच्या या कार्यक्रमा प्रसंगी संदिप रायते, राहुल पवार, मंगेश वाघमारे, दयानंद जाधव, शिवशंकर देशमुख, भगवान व्यवहारे, ओमशेखर काळा, भूषण चौधरी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे दिवसा घरफोडीत 79.5 तोळे सोन्यासह 20 लाख 34 हजाराचा मुद्देमाल लंपास, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे माऊंट एव्हरेस्ट बेस कँम्पची मोहीम फत्ते करीत स्वगृही परतले,भारतीय किसान सेनेतर्फे करण्यात आला सत्कार

Next Post
आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी उने ३० अंश सेल्सियस तापमानात एव्हरेस्ट बेस कँप मोहीम केली यशस्वी

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे माऊंट एव्हरेस्ट बेस कँम्पची मोहीम फत्ते करीत स्वगृही परतले,भारतीय किसान सेनेतर्फे करण्यात आला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add