नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार शहरात आषाढी एकादशीनिमित्त ड्राय डे असताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मद्यविक्री करणाऱ्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संसर्ग संदर्भात तसेच आषाढी एकादशी निमित्ताने ड्रायडे मनाई आदेश जारी केलेले असताना शहरातील मंगळ बाजार परिसरातील भारत शुज दुकानाच्या शेजारी देशी दारूच्या दुकानात विना मास्क मद्यविक्री करताना आढळून आले . याप्रकरणी प्रतीक रवींद्र चौधरी , योगेश हिंमत पाटील , रवींद्र मंगा चौधरी रा . चौधरी गल्ली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याशिवाय शहरातील जळगाव बाजार परिसरातील संजय बियरबारचे दुकान शेजारी देशी दारूच्या दुकानात मद्यविक्री करणाऱ्या खुशाल जगदीश चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .








