तळोदा ! प्रतिनिधी
प्रतापपूर येथील एक एकरातील ऊस जळून खाक प्रतापपूर – तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील शक्तिदेवसिंग राणा यांच्या चार एकर क्षेत्रातील उसाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली . या आगीत एक एकरवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली . या वेळी तळोदा नगर परिषदेच्या अग्रिशमन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले . सर्वे नंबर १५० / ब क्षेत्रातील शक्तिदेवसिंग राणा यांच्या शेतातील उसाला शेतातून जाणाऱ्या विजेच्या मुख्य वाहिनीत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची घटना घडली . या घटनेचे वृत्त गावात पोहोचताच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयन केले . या वेळी तळोदा येथील पालिकेच्या अनिशमन बंबालाही पाचारण करण्यात आले होते .