म्हसावद l प्रतिनिधी
स्वतंत्र भारत देशाच्या 73 वा प्रजासत्ताक दिनी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी 26 किलोमीटर सायकल मॅरेथाॅन यशस्वीरित्या 20 विद्यार्थ्यांनी पुर्ण केली.
प.पू.सती गोदावरी माता माध्यमिक विद्यालय म्हसावद,ता.शहादा येथील 3 विद्यार्थीनी व 17 विद्यार्थी असे एकूण 20 सायकलपटूंनी सायकल मॅरेथाॅनमध्ये सहभाग घेवून 26 किलोमीटर यशस्वीरित्या सर्वांनी मॅरेथाॅन पुर्ण केले. या सायकल मॅरेथाॅन स्पर्धेत भावेश सुर्यवंशी याने प्रथम,यश धनगर द्वितीय तर जयेश भोसले याने तृतीय क्रमांक पटकावला.मृणाली सुर्यवंशी,कृपा सुर्यवंशी,कोमल जगदाळे,विवेक महाले,पियुष पावरा,भुषण वसावे,ओम सुर्यवंशी,सोमेश्वर जगदाळे,प्रेम मोरे,पवन पाटील,अब्दुल्ला तेली,तन्मय धनगर,वैभव खोंडे,लकी मराठे यांच्यासह क्रीडाशिक्षक सुधाकर पाटील यांनी यशस्वी सहभाग नोंदवला.यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा गुजर यांचे मार्दर्शनाखाली क्रीडा शिक्षक सुधाकर पाटील यांनी परिश्रम घेतले.म्हसावदचे शशिकांत पाटील यांनी 53 किलोमीटर तर राहूल पाडवी याने 20 किलोमीटर सायकल मॅरेथाॅन पुर्ण केली.








