शहादा | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाणे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमास अटक करून कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी एकता परिषदेने केली आहे.
याबाबत शहादा उपविभागीय पोलीस अधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, शहादा तालुक्यातील मंदाणा येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत अत्याचार करण्यात आला. घरात कोणी नसतांना विश्वास रूपचंद पाटील याने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयीताला अटक केली असली तरी आजारी असल्याचे कारण दाखवून संशयीत जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याची चर्चा आहे. म्हणून संशयीत नराधम विश्वास रूपचंद पाटील याच्यावर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आदिवासी एकता परिषदेचे संतोष पावरा, दिपक ठाकरे, सुभाष नाईक, सिताराम भिलावे, अजय सोनवणे आदींनी केला आहे.