नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात दोन दिवसात विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई करीत २१ मद्यपी दुचाकी चालकांविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा येथे भुपेंद्र मानसिंग वळवी, मानसिंग वेस्ता वसावा व राजेंद्र रायसिंग वसावा. मोलगी येथे राकेश आरशी वसावे, अतुल विजय वसावे व ओल्या दिवाल्या राऊत. धडगाव येथील किर्तन रमेश पावरा व दिनेश विका पावरा. सारंगखेडा येथे अशोक तुकाराम पाटील व मुकेशकुमार लक्ष्मण भोसले. म्हसावद येथे दिलीप दाज्या पराडके तर नवापूर येथील सुमन दिलीप मावची, किरणभाई मनियाभाई वळवी, जितेश दिलीप वसावे, नितेश उत्तम गावित, प्रकाशभाई वसंतभाई गामीत, सागर राजू मावची, मयूर गुणवंत बोरसे, हरीषभाई सखारामभाई वळवी, अरुण विक्रम वळवी व नितीन दगा सुर्यवंशी अशा २१ दुचाकीस्वार मद्य पिऊन दुचाकी चालवितांना आढळून आल्याने संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








