Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैधरित्या पेट्रोल, बायोडिझेल बाळगल्याने दोघां विरूद्ध गुन्हा दाखल

team by team
January 2, 2022
in क्राईम
0

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील सोनखुर्दे अक्कलकुवा तालुक्यातील कोराई येथे अवैधरित्या पेट्रोल-डिझेल सदृष्य द्रव्य विक्री व साठवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील सोनखुर्दे येथील गोविंद डेमश्या पावरा हा एका झोपडीच्या आडोश्याला अवैधरित्या ज्वालाग्रही पेट्रोल सदृष्य द्रव्य विक्री करतांना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ५५० रुपये किंमतीचे पाच लिटर द्रव्य जप्त केले. याबाबत पोशि.प्रतापसिंग गिरासे यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात गोविंद पावरा याच्याविरोधात भादंवि कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.वळवी करीत आहेत. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील राहूल मोहन चित्रकथे याने अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील कोराई गावाजवळ एका चिंचेच्या झाडाजवळ अवैधरित्या ज्वालाग्रही पदार्थाची साठवणूक केल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून ८ हजार रुपये किंमतीचे १०० लिटर बायोझिडल सदृष्य पदार्थ जप्त केले आहे. याबाबत पोना.अमोल खवळे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात राहूल चित्रकथे यााच्याविरोधात भादंवि कलम २८५, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यातील २१ मद्यपी दुचाकीस्वारांवर पोलिसाची कारवाई

Next Post

विठ्ठल थगनारे यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय शाळेत दुग्धशर्करा योग साजरा

Next Post
विठ्ठल थगनारे यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय शाळेत दुग्धशर्करा योग साजरा

विठ्ठल थगनारे यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय शाळेत दुग्धशर्करा योग साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add