Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लुप्त होत जाणाऱ्या पोस्ट कार्डवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढले चित्र, कोरोनायोद्धाना संदेश देण्याचा कलाशिक्षकाचा अनोखा उपक्रम

team by team
December 30, 2021
in शैक्षणिक
0
लुप्त होत जाणाऱ्या पोस्ट कार्डवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढले चित्र, कोरोनायोद्धाना संदेश देण्याचा कलाशिक्षकाचा अनोखा उपक्रम

म्हसावद l प्रतिनिधी
पोस्टकार्ड सध्या दुर्लक्षीत होत जात आहे. आत्ताच्या पिढीला पोस्टकार्ड,पोस्ट ऑफिस, पत्र लेखन, पोस्ट कार्डवर संदेश कसा दिला जातो,पोस्ट ऑफिस विषयी आवड निर्माण व्हावी यासाठी सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे कलाशिक्षक यांनी उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी त्या पोस्ट कार्डवर विविध चित्र काढले,त्यातून स्पर्धा घेतली,प्रदर्शन भरविले, विध्यार्थीना बक्षीस ही दिलीत,आणि ते शुभेच्छा पत्र आता नातेवाईक, शिक्षका,संचालक मंडळ,शिक्षण विभाग,आदींना पाठविले.व नवीन वर्षाच्या शुभेच्छा पोस्ट कार्डवर विद्यार्थ्यांनी दिल्यात.


पोस्टकार्ड, पोस्ट ऑफिस, पत्रलेखन, संदेश, पोस्ट कार्ड द्वारे शुभेच्छा, आत्ताच्या पिढीला पोस्ट ऑफिस चे कार्य असे चालते या विषयी माहिती व्हावी, व पोस्टकार्ड वर नवीन वर्षाच्या शुभेच्छा कोरोणा योद्धा,नातेवाईक, शिक्षक, मित्र परिवार, यांना देता यावे यासाठी प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे प्राचार्य एस.पी. पाटील, उपमुख्याध्यापक डी.टी.चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक नरेंद्र गोरख गुरव यांनी पोस्टकार्ड वर चित्र विविध चित्र काढून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचा एक नवीन उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस ची माहिती व्हावी यासाठी पोस्ट ऑफिस म्हणून पोस्ट कार्ड आणावयास सांगितले. नंतर एक दिवस पूर्ण पोस्ट कार्ड वर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे चित्र उदा. निसर्ग चित्र, अक्षर लेखन, सुंदर देखावा, कार्टून, डिझाईन, या विषयी कलाशिक्षक नरेंद्र गुरव यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी चित्र काढले, त्यात रंग भरले, शुभेच्छा देणारे 170 शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड विद्यार्थ्याने तयार केले.
तयार झालेले पोस्टकार्ड वर विद्यार्थी आता आपले आवडते शिक्षक, नातेवाईक, शिक्षण विभाग, संस्था संस्थाचालक, मित्रपरिवार महसूल अधिकारी,पत्रकार, अधिकारी, समाज सेवक, कोरोना योद्धा आदीना हे नवीन वर्षाच्या शुभेच्छा पत्र हे विद्यार्थी पोस्टाद्वारे पाठविणार आहेत.
या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
या उपक्रमाचे प्रदर्शन भरवण्यात आले त्याचे उद्घाटन प्राचार्य एस पी पाटील यांनी केले. प्रदर्शनाचे पाहणी शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी केली, सहभाग झालेल्या 170 कार्ड वरील निवडक चित्रांना बक्षीसही देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक वेदांती भावसिंग बोरसे, द्वितीय स्नेहल महेश चौधरी, तृतीय श्रुती जितेंद्र पाटील, चतुर्थ रोशनी छोटु सामुद्रे, आणि उत्तेजनार्थ मध्ये चेतन प्रकाश पाटील, सिद्धार्थ मनोज समुद्रे, ओम सुधाकर मराठे, विशेष सचिन खिलोसिया, सुस्मित सचिन जोशी, रितेश्वरी जितेंद्र वाडीले यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
या वेळी शिक्षक भरत पाटील, लता शिरसाठ, डी.टी. चौधरी, विध्यार्थी वेदांती बोरसे, दिपाली खेडकर, आदींनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक यांनी सांगितले की, प्रकाशा ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी संबंधित शिक्षक विविध उपक्रम राबवत असतात. पूर्वीच्या काळी पोस्टकार्ड द्वारे संदेश दिला जायचा. मात्र आता संगणक आणि मोबाईल युगामध्ये विद्यार्थ्यांपासून पोस्टकार्ड लुप्त झाले होते.मात्र त्या पोस्टकार्ड विषय, पोस्ट ऑफिस विषयी, माहिती व्हावी यासाठी कला शिक्षकांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला हे कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक संजय मकवाना, अनुप गोसावी, वैकुंठ पाटील, दीपक कोकणी, लता शिरसाठ, सविता पाटील, सोनवणे ज्योती, आर.बी.गिरासे, आदींनी प्रयत्न केले.
पोस्टकार्ड विद्यार्थ्यांपासून दुर्लक्षित होत असताना विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड विषयी आपुलकी निर्माण व्हावी म्हणून कला शिक्षकांनी हा उपक्रम हाती घेतला. विद्यार्थ्यांना पोस्ट कार्ड घेण्यासाठी विद्याधर पोस्ट ऑफिस मध्ये पाठवले, विद्यार्थ्यांनी कार्ड आणले, त्यावर चित्र काढले, त्याच्या मागच्या बाजूला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे शब्द लिहिलेत, आता हे तयार झालेले कार्ड, कोरणा योद्धा, तसेच विद्यार्थ्यांचे नातेवाईक, आवडते शिक्षक, संचालक मंडळ पत्रकार, आदिनाथ विद्यार्थी पाठवणार आहेत

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, पोस्टकार्ड व विद्यार्थी यांच्यामधील नातं दृढ व्हावं त्यांना पत्रलेखन, संदेश, शुभेच्छा पत्र कसे लिहावं याची माहिती व्हावी या साठी उपक्रम राबवला व ज्यांनी कोरोना काळामध्ये कोरणा युद्धाची काम केलीत त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलेला आहे.आता ही विद्यार्थी यांना पत्र पाठवणार आहेत.
नरेंद्र गुरव,
प्रकाशा कलाशिक्षक

बातमी शेअर करा
Previous Post

बोरद येथे बिबट्या अडकला सस्यांच्या जाळ्यात

Next Post

सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते मोरांबा शासकीय आश्रमशाळेत जात प्रमाणपत्रांचे वितरण

Next Post
सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते मोरांबा शासकीय आश्रमशाळेत जात प्रमाणपत्रांचे वितरण

सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते मोरांबा शासकीय आश्रमशाळेत जात प्रमाणपत्रांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add