Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते मोरांबा शासकीय आश्रमशाळेत जात प्रमाणपत्रांचे वितरण

team by team
December 30, 2021
in शैक्षणिक
0
सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते मोरांबा शासकीय आश्रमशाळेत जात प्रमाणपत्रांचे वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी
मोरांबा, ता. अक्कलकुवा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष यांच्या हस्ते 70 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व 100 विद्यार्थ्यांना आधार कार्ड दुरुस्ती करुन वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.घोष म्हणाले की, आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत जातीचे दाखले व आधार कार्ड दुरुस्तीचा लाभ तळोदा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळांना मिळणार आहे. यामुळे दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच आधारकार्ड दुरुस्तीसाठी शहरात येण्याची आवश्यकता असणार नाही. त्यांना हे दाखले त्यांच्या शाळेत किंवा महाविद्यालयात प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत थेट वाटप करण्यात येईल. जात प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड दुरुस्तीवर येणारा खर्च आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. या सुविधेचा आश्रमशाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मुख्याध्यापक एस. आर. चौधरी, अधीक्षक मनोज कुरकुरे, एस. वाय नरवाडे, पी. पी. महाजन, बायजा पाडवी, सुरज पावरा, मनीष पाडवी, बिरबल वसावे, विजेसिंग वसावे, जयसिंग वसावे, कांतीलाल वसावे, मदन हळदे, सेतू चालक वाल्मीक पाटील, शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

लुप्त होत जाणाऱ्या पोस्ट कार्डवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढले चित्र, कोरोनायोद्धाना संदेश देण्याचा कलाशिक्षकाचा अनोखा उपक्रम

Next Post

नंदूरबार जिल्हात आज पुन्हा आढळला कोरोना पॉझिटीव्ह

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदूरबार जिल्हात आज पुन्हा आढळला कोरोना पॉझिटीव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add