नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील सीबी गार्डनजवळ लहान मुलांच्या भांडणातून समजाविण्यासाठी गेला असता एकाने सीबी गार्डनजवळ डोक्यावर बॅट मारुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संशयिताविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार शहरातील सीबी गार्डनजवळ पूजाबाई निलेश चौधरी यांच्या लहान मुलास जिन्या पाडवी यांच्या लहान मुलाने मारहाण केली.यामुळे निलेश अनिल चौधरी हे जिन्या पाडवी यांना समजाविण्यासाठी गेले असता याचा राग आल्याने जिन्या पाडवी याने निलेश चौधरी यांच्या डोक्यावर बॅट मारुन गंभीर दुखापत केली.यात निलेश चौधरी यांना दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गंभीर जखम झाल्याचे सांगितले.दरम्यान, जिन्या पाडवी याने निलेश चौधरी यांना शिविगाळ केल्याचे पूजाबाई चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.सदरच्या फिर्यादीवरुन संशयित जिन्या पाडवी याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२६,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवणे करत आहेत.








