Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

समस्त आदिवासी पावरा समाज मंडळातर्फे उद्या वार्षिक स्नेह संमेलन

team by team
December 25, 2021
in सामाजिक
0

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील समस्त आदिवासी पावरा समाज मंडळातर्फे आज २६ डिसेंबर रविवार रोजी वार्षिक स्नेह संम्मेलन (मेळावा) आयोजित करण्यात आला आहे. या वार्षिक स्नेह संम्मेलन (मेळावा) कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी वेळेवर पारंपारीक वेशभूषा परिधान करून उपस्थित रहावे. कार्यक्रमात कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, अशी माहिती आदिवासी पावरा समाज मंडळाचे डॉ.मनोज पावरा यांनी दिली आहे.
येथील याहा मोगी माता मंदीर, नवापूर चौफूली येथे सकाळी १०.०० वाजता होत असलेल्या या वार्षिक स्नेह संम्मेलन (मेळावा) साठी शासकीय नौकरी, व्यापार व इतर व्यवसायानिमित्त नंदुरबार शहर व परिसरात वास्तव्यास असलेले तसेच शहादा, तळोदा व धुळे येथिल जवळ पास १०० आदिवासी पावरा बांधवांचे कुटुंबियांची उपस्थिती अपेक्षीत आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने पावरा समाजातील विविध शासकीय विभागात सद्या कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, सेवा निवृत्त वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच इतर खाजगी क्षेत्रात कामकाज करणारे पावरा समाज बांधवांचा समावेश राहिल. कार्यक्रमात सहभागी होणारे प्रत्येक पुरूष, महिला व लहान मुले हे आदिवासी पावरा समाजाची पारंपारीक वेशभूषा परिधान करून सहभागी होणार आहेत. त्यामुळे आदिवासी पावरा समाजातील पारंपारीक जीवनशैली व संस्कृतीचे प्रतीक स्वरूपात प्रदर्शन दिसून येईल. आयोजित कार्यक्रमात प्रामुख्याने आदिवासी पावरा समाजातील कुटूंबीयांची ओळख-पाळख, बाहेर गावाहून आलेले, तसेच समाज मंडळाचे वरीष्ठ सभासद, व नवीन सभासद झालेल्या समाज बांधव व भगिनींचे स्वागत, पारंपारिक पावरा बोलीभाषेतून एकमेकांशी संवाद साधून सांस्कृतीक विचारांची देवाण-घेवाण करणे, पारंपारीक आदिवासी नृत्य-संगीत, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह-भोजन या प्रकारे रूपरेषा आयोजकांमार्फत आखण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पेट्रोलची उघड्यावर विक्री करणाऱ्या तिघांविरूद्ध शहादा पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

लहान मुलांच्या भांडणातून एकास डोक्यावर बॅट मारुन गंभीर केली दुखापत

Next Post

लहान मुलांच्या भांडणातून एकास डोक्यावर बॅट मारुन गंभीर केली दुखापत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add