Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार शहरातील व्यावसायिकाकडे आज पुन्हा धाडसत्र सुरूच, २६ जण रडारवर

team by team
December 23, 2021
in क्राईम
0
राज्यभर वाटप होणार्‍या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्याच्या ठिकाणीच लाभार्थी वंचीत, प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा ईशारा

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील 9 व्यापारी व एका डॉक्टरसह अक्कलकुवा येथील एका व्यक्तीं व त्यांच्या आस्थापनांमध्ये काल सकाळीच नाशिक व औरंगाबाद येथील आयकर विभागाच्या पथकांची धाडी टाकल्या होत्या.रात्रीपर्यंत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.त्यानंतर आज दि.२३ डिसेंबर रोजी पुन्हा धाडसत्र सुरूच आहे.
पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. नंदुरबार शहरातील ९ नामांकित व्यापाऱ्यांसह एका डॉक्टरा यांच्या आस्थापनांमध्ये काल दि.२२ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास नाशिक आणि औरंगाबाद येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथकाने अचानक टाकलेल्या धाडी मुळे अनेक अनेकांचे धाबे दणाणले . ही कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी नंदुरबार मधील बडे व्यावसायिक चांगलेच हादरले काही बड्या व्यापाऱ्यांनी आपले आस्थापने बंद करीत बाहेर गावी निघणे पसंत केले.आयकर विभागाची कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरू असल्याचे समजते.सध्या आयकर विभागाने उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , कर्नाटक असे क्रमाने विविध राज्यात छापेमारी करीत अब्जावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता हुडकून काढणे चालू ठेवले आहे . मागील दोन महिन्यात अवैध व्यवहार , बेकायदेशीर खरेदी – विक्री , बनावट कर्ज प्रकरणे , बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेल्या विवध ट्रस्टच्या माध्यमातून घोटाळे याच्याशी संबंधित व्यवहार उघड केले जात आहेत . केंद्रीय पथकांनी सुरू ठेवलेल्या या मोहिमेचा देशस्तरावरील काही बड्या ग्रुपला तसेच बड्या नेत्यांना फटका बसला . अशातच महाराष्ट्रातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याकडे या पथकांनी अचानक वक्री नजर वळवल्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे . अर्थात हे पथक केंद्रातील आहे की राज्य स्तरावरील आहे याची स्पष्टता अधिकृतपणे झालेली नाही . परंतु कागदपत्रांची नोंदींची व दप्तराची झाडाझडती घेतली जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे .नंदूरबार शहरातील ९ व्यापारी व एका डॉक्टरच्या घरासह आस्थापनांमध्ये आयकर विभागाने छापा टाकला.काल दिवसभर व्यावसायिकाची व त्याच्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.त्यानंतर आज दि.२३ रोजी पुन्हा या व्यापाऱ्यांकडे तपासणी सुरू असल्याचे समजते.आयकर विभागाच्या पथकांनी ही कारवाई केल्याचे म्हटले जाते . दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या पथकांच्या रडारवर जिल्ह्यातील २६ व्यापारी असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.तथापि पथकांविषयीची अधिकृत माहिती कोणत्याही स्तरावरून देण्यात आलेले नाही .

 

बातमी शेअर करा
Previous Post

रस्त्याच्या वादावरून पती-पत्नी घरात असताना घराला लावली आग, दोघे जखमी, सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ख्रिसमसनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ख्रिसमसनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add