नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनची सर्वसाधारण सभा व मेळावा गांधीनगरमधील पेन्शनर्स भवनात मधुकर साबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सभेस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहूल चौधरी,उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण देवरे,माजी प्राचार्य बी.एस.पाटील,धुळे पेन्शनर्स असो.सचिव आनंदराव पाटील,सेवानिवृत्त गटविकास अधिकारी शांतीलाल शिंदे,अदि उपस्थित होते.
सभेच्या सुरवातीस दिवंगतांना श्रध्दांजली वाहण्यात आली व दिपप्रज्वलन व सरस्वतीपुजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.सभेत देणगी दात्यांचा व उल्लेखनिय पुरस्कार प्राप्त सभासदाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सचिव दिलीप पाटील यांनी २०१९-२० व २०२०-२१या दोन्ही वर्षाचे अहवाल व जमा खर्च, अंदाजपत्रकाचे वाचन केले.व त्यांस सर्वानुमते मजुरी देण्यात आली.यावेळी डॉ.चौधरी यांनी सांगितले की पेन्शनराचे भावविश्व कसे असते हे मला माहित आहे.जे सेवानिवृत्ती नंतरचे निवृत्ती वेतनधारक आहेत व जे निवड श्रेणीला बसत आहेत असे ४२ प्रस्ताव आमच्याकडे आले असून त्यातले ३५ प्रस्ताव मंजूर केले असून त्यासाठी वित्त व लेखाचा अभिप्राय आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे.आता जे शिक्षक सेवानिवृत्त होतील त्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शनसह इतर सर्व लाभ वित्त विभागाच्या सहकार्याने देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तर देवरे यांनी वित्त विभागात निवडश्रेणी व इतर पेन्शनरच्या संबधिेत प्रकरणाचा लवकर निपटारा करण्यात सहकार्य करणार असल्यांचे सांगितले. सभेत प्रा.बी.एस.पाटील,आनंदराव पाटील,मधुकर साबळे,शांतीलाल शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. नविन २०२१-२५ वर्षासाठी कार्यकारणी सर्वानुमते जाहिर करण्यात आली.यांत अध्यक्षपदी मधुकर साबळे,उपाध्यक्ष नकुल वळवी,कोषाध्यक्ष उखाभाउ पिंपरे,सचिव दिलीप पाटील,सहसचिव केसरसिंग राजपूत,तर सदस्यपदी रमेश माळी,आत्माराम इंदवे,कैलासपुरी गोसावी,मगन परमार,न्याहलिक शिरसाठ,विमल पाटील,तर स्विकृत सदस्यपदी पांडूरंग क्षीरसागर,मधुकर रामोळे,मोतीराम पाडवी,रवींद्र पेंढारकर,अदिची निवड करण्यात आली.सभेला आई-वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष बारकू पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत चौधरी,उपस्थित होते.कार्यक्रमासाठी रमेश माळी,रामकृष्ण मोरे,के.एल.राजपूत,मनिलाल सौपुरे,अजयसिंग गिरासे,जी.पी.पाटील,अदिनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आत्माराम इंदवे यांनी तर आभार दिलीप पाटील यांनी मानले.








