Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाला न्याय द्यावा बहुजन समाज पार्टीचे राज्यपालांना निवेदन

team by team
December 22, 2021
in राजकीय
0
ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाला न्याय द्यावा बहुजन समाज पार्टीचे राज्यपालांना निवेदन

नंदूरबार l प्रतिनिधी

ओबीसी बांधवांच्या राजकीय प्रतिनिधित्वासंबंधी राज्य सरकारला योग्य निर्देश देवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा तिढा सुटेपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्यात यावेत, राज्य मागास आयोगामार्फत इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत तसेच राज्यातील इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक तो निधी पुरवण्याच्या सूचना कराव्यात, अशी विविध मागण्या निवेदन बहुजन समाज पार्टीतर्फे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले.
बहुजन समाज पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राम्हणे यांनी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,  सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र सरकारच्या वटहूकुमावर स्थगिती कायम ठेवल्याने राज्यातील इतर मागास वर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य सरकार न्यायालयात अभ्यासपूर्ण तसेच प्रभावीपणे बाजू मांडण्यात मागे पडले आहे. जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. राज्य मागास आयोगामार्फत आतापासूनच राज्यातील ओबीसी बांधवांची माहिती एकत्रित करण्यासाठी राज्य सरकारने निर्देश द्यावेत, अशी बसपाची आग्रही मागणी आहे. संबंधित माहिती एकत्रित करण्यासाठी पुरेसा निधी सरकारकडून पुरवण्यात आला नसल्याची बाब मध्यंतरी समोर आली आहे. अशात निधीअभावी माहिती संकलनाचे काम मागे पडू नये,अशी बसपाची मागणी आहे. सदर प्रकरणात आपण प्राधान्याने लक्ष घालून राज्य सरकारला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी मनोज वसईकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मिनाबाई जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संतोष अहिरे, जिल्हा सचिव राजेंद्र महाले, विधानसभा उपाध्यक्ष दीपक महिरे, कार्यालयीन सचिव विश्‍वास पवार, सुभाष बिर्‍हाडे, अविनाश वाघ, मोहन अहिरे, प्रकाश बैसाणे, राहुल निकम, जितेंद्र तायडे, प्रेममाला कुवर, पावबा महिरे, सना जावेद शहा, बिरजू बैसाणे आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात बिडीओंना निवेदन

Next Post

नंदुरबार येथे जिल्‍हा पेन्‍शनर्स असोसिएशनची सर्वसाधारण सभा व मेळावा उत्साहात

Next Post
नंदुरबार येथे जिल्‍हा पेन्‍शनर्स असोसिएशनची सर्वसाधारण सभा व मेळावा उत्साहात

नंदुरबार येथे जिल्‍हा पेन्‍शनर्स असोसिएशनची सर्वसाधारण सभा व मेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add