Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे खुर्द येथे २४ डिसेंबर पासून श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताह,१०३ वर्षाची आहे परंपरा

team by team
December 23, 2021
in सामाजिक
0
नंदूरबार l प्रतिनिधी
     उमर्दे खुर्द ता.नंदूरबार येथे मार्गशीर्ष वद्य पंचमी दि. २४  डिसेंबर २०२१ पासून श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहास येथील  विठ्ठल मंदिरात सुरुवात होत आहे.
 उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथे  सप्ताहाची १०३ वर्षाची परंपरा आहे. येथील महादू चिमन पेटकर, सुपडू शेठ शिंपी, काळू शिवबा बेंद्रे यांच्या सहकाऱ्यांनी व भजनी मंडळांनी गावातील चावडीवर सप्ताहाची सुरुवात केली. चावडीवर पाच ते सात वर्ष  सप्ताह झाला त्यानंतर श्री.हनुमान मंदिरावर आतापर्यंत तिसरी पिढी सप्ताहाचे आयोजन करत आहे .एक वर्षापूर्वी विठ्ठल रुक्माई मंदिर बांधण्यात आल्याने या वर्षापासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण व किर्तनी सप्ताह सप्ताहास सुरुवात होत आहे. दि.२४ डिसेंबर रोजी मंदिराचा प्रथम वर्धापन दिवस चा औचित्य साधून  श्री. ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताह होत आहे.
    उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथील श्री विठ्ठल मंदिरात २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन सप्ताहाचे आयोजन  ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.२४ डिसेंबर २१  शुक्रवार रोजी ह.भ.प. श्रीराम महाराज धुळे यांचे कीर्तन,  २५ डिसेंबरला (शिवचरित्र कार ) संभाजी महाराज नाशिककर, २६ डिसेंबरला ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज धावडेकर, २७ डिसेंबर रोजी ह. भ. प. मुरलीधर महाराज कडरेकर,  २८ डिसेंबर रोजी मच्छिंद्र महाराज वाडीभोकर, २९ डिसेंबर रोजी ह. भ. प. प्रतिभाताई महाराज सोनगीर, ३०डिसेंबर व ३१डिसेंबर रोजी काल्याचे किर्तन आनंदराव महाराज बोरकुंड यांचे होणार असून महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन कार्यक्रम सकाळी पाच ते सहा काकड आरती, श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी 9 ते 11 व दुपारी 3 ते 5 , हरिपाठ 6 ते 7  रात्री 8 ते 10 कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्ञानेश्वरी पारायण ह. भ. प. महारू महाराज सळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२४ डिसेंबर २१ पासून होणार असून मृदुंग आचार्य म्हणून पावबा महाराज  वैंदाणेकर, गायनाचार्य म्हणून बापू महाराज नंदाणे, रविंद्र महाराज लामकानी, हार्मोनियम ह. भ. प. रमेश कुटे उमर्दे, ह.भ.प. दत्तू पेटकर उमर्दे  हे श्री.ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तनासाठी सेवा देणार आहे दहिंदुले काकर्दे विखरण, कलमाडी, डिसेंबर , सिंदगव्हाण, वडवद, भालेर, चौपाळे, रजाळे, निंभेल, कढरे, मोहिदा (क सं) ,रांजणी, आसाने आदी. गावातील भजनी मंडळ कीर्तनात सहभागी होणार आहेत कार्यक्रमाचे आयोजन श्री. विठ्ठल मंदिर ट्रस्ट व समस्त  ग्रामस्थांतर्फे श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तने सप्ताहाचे करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे जिल्‍हा पेन्‍शनर्स असोसिएशनची सर्वसाधारण सभा व मेळावा उत्साहात

Next Post

नंदुरबार जिल्ह्याचा 1811 कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा

Next Post
नंदुरबार जिल्ह्याचा 1811 कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा

नंदुरबार जिल्ह्याचा 1811 कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add