तळोदा l प्रतिनिधी

तळोदा येथील तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक घेण्यात आली. या बैइकीत एकुण २२६ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर १५१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.
अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रविण वळवी होते. यावेळी तहसिलदार गिरीष वखारे, नायब तहसिलदार शैलेद्र गवते, धमेंद्र वळवी, कु. निशा वळवी, सचिन राहसे, प्रकाश कुलकर्णी, नाथा पावरा, सत्यवान पाडवी, गोपाल पाडवी, नितीन पाडवी, जितेंद्र दुबे, गटविकास अधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
बैठकीत सर्व योजनेची एकुण २२६ प्रकरणे मंजूर करण्यात आली. १५१ प्रकरणे अपात्र करण्यात आली. एकुण ३७७ प्रकरणावर बैठकीत कामकाज करण्यात आले. यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा अर्जदाराची १०१ प्रकरणे, अपंग अर्जदाराची २५ प्रकरणे व इतर निकषात बसणारी १९ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तसेच वृध्दापकाळ/श्रावणबाळ योजनेची ८१ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.









