अक्कलकुवा l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अक्कलकुवा तर्फे परिसंवाद व कार्यकर्ता शिबिर मेळावा आयोजित करण्यात आला होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अक्कलकुवा तालुकाध्यक्ष रायसिंग वळवी हे होते. प्रमुख मार्गदर्शन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे यांनी केले.मार्गदर्शन करताना म्हणाले की, तालुक्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वाढदिवस निमित्ताने मोलगी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात संजय गांधी योजना,घरकुल योजना, श्रावण बाळ योजना,वनपट्टे धारक,यांचे नाव नोदणी योजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तालुक्यातील नागरिकाच्या ज्या काही समस्या असतील त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडण्यात येतील,तसेच महिन्याच्या पहिल्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अक्कलकुवा येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या नागरिकांच्या समस्या असतील त्या सोडविणार तसेच प्रशासन आपल्या दारी संकल्पना तालुक्यात राबविण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी कार्यकर्त्यानीं गाव तिथे राष्ट्रवादी ही संकल्पना राबवली जाणार असल्याचे संकल्प केला. तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष जलद गतीने वाढवावे असे आव्हान तालुकाध्यक्ष रायसिंग वळवी यांनी केले व तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी आपापल्या समस्या जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या समोर मांडणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी धडगाव-अक्कलकुवा विधानसभा प्रभारी संगीता पाडवी,जिल्हा, युवक उपाध्यक्ष गणेश पाडवी, तालुकाध्यक्ष सरचिटणीस ॲड. एच. एन.पाडवी,यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सदस्य सर्फउद्दीन मक्राणी, उपाध्यक्ष अलीम मक्राणी , तालुका युवक अध्यक्ष सागर वळवी अक्कलकुवा, महिला तालुकाध्यक्षा नर्गिस मक्राणी, विनोद कुमार पाडवी,खोजल्या वसावे,आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन अक्कलकुवा आदिवासी सेल तालुकाध्यक्ष गजानन वसावे यांनी केले होते.










