Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनुकंपातत्व नियुक्ती प्रकरणात २ महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचा औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

team by team
December 12, 2021
in क्राईम
0

अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील भगदरीच्या याचिकाकर्त्या मिनल पाडवींच्या अनुकंपातत्व नियुक्ती प्रकरणात २ महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, याचिकाकर्ती मिनल उत्तम पाडवी, रा. भगदरी, ता. अक्कलकुवा, हिने सन 2018 साली विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे विभाग, धुळे, यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. तरी देखील संबंधित अधिकारी यांनी नियुक्तीच्या संदर्भात कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला नव्हता. म्हणून याचिकाकर्ती हिने सदर अर्जावर निर्णय घेण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्या मार्फत रिट दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी सदर प्रकरणात माननीय विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग, धुळे, यांना नोटीस बजावल्यानंतर सदर प्रतिवादी यांनी पत्रान्वये याचिकाकर्ते हिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कळविले होते. तसेच सदर कागदपत्रांची पडताळणी नंतर सदर मंजूर प्रकरण नेमणुकी करिता मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे पाठविण्यात येईल असे कळविले होते. माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दि. २८ जून २०२१ च्या आदेशान्वये सदर पत्राच्या संदर्भानुसार प्रकरण निकाली काढण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले होते. सदर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही सदर अर्जावर कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय न घेण्यात आल्यामुळे याचिकाकर्ते हिने माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली असता मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. जी. दिघे ) यांनी दि.६ डिसेंबर २०२१ च्या आदेशान्वये दोन महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे आदेश पारित केले. याचिकाकर्ते तर्फे ॲड. गजेंद्र देवीचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथे राष्ट्रवादीतर्फे परिसंवाद व कार्यकर्ता मेळावा उत्साहात

Next Post

तळोदा पालिकेचे सत्ताधारी नगरसेवक माझ्या संपर्कात असून ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार : मा. आ.उदेसिंग पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add