नंदुरबार | प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष,पद्मविभूषण खा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नंदुरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यात तसेच शहरात आयोजित व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष,पद्मविभूषण खा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नंदुरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यात तसेच शहरात आयोजित व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

नंदुरबार शहर व तालुका याच्यांवतीने जगताप लॉन्स येथे जिल्हा सरचिटणीसमधुकर पाटील,शहराध्यक्ष नितिन जगताप,महिला जिल्हा संमनव्यक सिमा सोनगरे,जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी,तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील,रविंद्र पाटील,महिला शहराध्यक्षा उषा वळवी यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम पार पडला. शहादा शहर व तालुकातर्फे शिव प्लाझा येथे व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र वाघ, उपाध्यक्ष शांतीलाल साळी,जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे,महिला जिल्हा निरिक्षक मिनाक्षी चव्हाण,महिला जिल्हाध्यक्षा ऍड.अश्विनी जोशी,शहाराध्यक्ष सुरेंद्र कुवर,तालुकाध्यक्ष माधव पाटील,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंदारे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ऍड.दानीश पठान,युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा,डॉ.नितिन पवार आदी नगरसेवक,पं.स सदस्य,सरपंच,विविध सेव,आघाडी पदाधिकारी उपस्थित होते. नवापुर शहर व तालुका यांच्यातर्फे अग्रवाल भवन येथे व्हर्च्युअल रॅलीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे,नगरसेवक खलील खाटीक,शहराध्यक्ष शरद पाटील,तालुकाध्यक्ष सुरेश कोकणी,अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष इरफान पठाण युवक तालुका अध्यक्ष आकाश गावित आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अक्कलकुवा तालुका व शहर यांच्या वतीने मोलगी येथे एकत्रित रित्या व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अलिम मक्राणी,तालुकाध्यक्ष रायसिंग वळवी,विधानसभा क्षेत्र प्रभारी संगीता पाडवी आदिवासी सेल तालुका अध्यक्ष गजानन वसावे,महिला तालुकायक्ष नर्गिस मक्राणी,युवक तालुकाध्यक्ष सागर वळवी,युवक जिल्हा उपाध्यक्ष ऍड रुपसिंग वळवी आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.









