तळोदा l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून त्यानुसार तळोदयात लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत येथील खान्देशी गल्ली परिसरात ७६ वर्षीय चंद्रभागा जावरे यांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी आरोग्य पर्यवेक्षक भिवसन वळवी, योगेश सोनवणे, आरोग्य सहाय्यक अशोक पाडवी, आरोग्यसेवक सी. जी. बोरसे, नगरपालिकेचे कर्मचारी नारायण चौधरी, श्रीमती वसावे, भूषण पाटील आदी उपस्थित होते.