Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शनिमांडळ येथे विविध कार्यक्रम

team by team
December 11, 2021
in सामाजिक
0
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शनिमांडळ येथे विविध कार्यक्रम

नंदूरबार l प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शनिमांडळ येथे परिसंवाद व कार्यकर्ता शिविर आणि लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणेसाठी अर्ज वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन तिलालीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मधुकर देवराम पाटील यांनी केले होते. यावेळी नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, माजी जि.प.सदस्य प्रविण पाटील, ॲड.प्रकाश भोई, जितेंद्र कोकणी, पंकज पाटील, बबलु कदमबांडे, आनंदा पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नितिन जगताप व ॲड.प्रकाश भोई यांनी आज देशाला शरद पवारांच्या विचाराची गरज असल्याचे सांगितले. यानंतर जि.प.शाळा तिलाली येथील गरिब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अपंग, विधवा, शेतमजूर, जेष्ठ नागरीक यांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी  सुमारे शंभरावर अर्ज भरुन घेण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे या लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन संबंधितांना लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचेही मधुकर पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास माजी सरपंच दिलीप पाटील, ग्रा.पं.सदस्य जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे उपाध्यक्ष वासुदेव माळी यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बैठकीत 283 प्रकरणे मंजूर

Next Post

तळोद्यात 76 वर्षीय आजीबाईने घेतली लस

Next Post
तळोद्यात 76 वर्षीय आजीबाईने घेतली लस

तळोद्यात 76 वर्षीय आजीबाईने घेतली लस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add