नंदुरबार | प्रतिनिधी-
येथील तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठकीत 283 प्रकरणे मंजूर करण्यात आले.तर 141 प्रकरणे नामंजूर करण्यात आली.
नंदूरबार येथील तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष देवमन पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.बैठकीत तहसिल कार्यालय येथे महा ई सेवा केद्रामार्फत प्राप्त झालेल्या अर्जाची शासन निर्णयानुसार परताळणी करण्यात आली. या बैठकीत एकूण 733 प्रकरणे ठेवण्यात आली होती.त्यापैकी 283 प्रकरणे मंजूर करण्यात आली.तर 141 प्रकरणे नामंजूर करण्यात आली तर 309 प्रकरणांची पूर्तता करण्यात आली.
यावेळी निकषानुसार पात्र अपात्र व पुर्ततेसाठी निर्णय घेण्यात येवून योजनानिहाय प्रकरणांची माहिती समितीच्या बैठकीत प्रास्ताविक तहसिलदार भाऊसाहेब थोरात तथा सदस्य सवि सगाधी समिती यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब तहसिलदार नितीन पाटील, यांनी केले. बैठकीस प्रामुख्याने इकबाल लुमान खाटीक, भास्कर सुकलाल पाटील आदी उपस्थित होते. अर्जाची योजनानिहाय कारवाई करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे यासाठी प्रिती पाटील, गणेश पाचोरे, मंगला गावीत, चेतन सोनार यांनी सहकार्य केले.