Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माझी वसुंधरा अभियान यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्वाचा : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

team by team
December 10, 2021
in आरोग्य
0
माझी वसुंधरा अभियान यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्वाचा : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

नंदुरबार l प्रतिनिधी
मानवी अस्तित्व हे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गातील भूमी , जल, वायु ,आकाश या पंचमहाभूतांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी शासनाने माझी वसुंधरा अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी आपला सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे व गावाला राज्यस्तरीय बक्षीस मिळवून द्यावेअसे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत निवड झालेल्या राजमोही मोठी ता. अक्कलकुवा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे बोलत होते . नंदुरबार जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियानांतर्गत एकूण पंधरा गावांचे निवड करण्यात आली आहे. अभियानात निवड झाल्यानंतर राजमोही ग्रामपंचायतअंतर्गत सुरू असलेले विविध उपक्रमांची पाहणी व गोविंद लसीकरणाबाबत सुरू असलेल्या हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्याचे काम पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी राजमोही येथे भेट दिली यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, निसर्गाचे संतुलन व पंचमहाभूतांचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड करून यांचे जतन करणे आवश्यक आहे. जलसंवर्धनासाठी वनराई बंधारे शोष खड्डे यासारखे उपक्रम राबवावेत. ऊर्जा बचतीसाठी सौर दिवे ,एलईडी दिवे यांचा वापर वाढवावा. प्रदूषण रोखण्यासाठी बायोगॅस, सौर चूल यांचा वापर वाढवावा, प्लास्टिक बंदी करावी तसेच सांडपाणी व घनकचरा चे व्यवस्थापन करून गाव स्वच्छ व सुंदर करावे. यानंतर त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना पर्यावरण संरक्षणाविषयी शपथ दिली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी सहाय्यक गटविकास अधिकारी महेश पोतदार आदी उपस्थित होते ,यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फडोळ यांनी उपस्थितांना माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबवावयाच्या व
विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच अभियानात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यस्तरावर बक्षीस कसे घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले तसेच अभियानाविषयी सर्व स्तरांपर्यंत जाणीव जागृती करण्यासाठी कोण कोणते उपक्रम राबवावेत याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी सरपंच जयमल पाडवी, पोलिस पाटील जगन पाडवी, रविकांत पाडवी, ग्रामसेवक मोहन वळवी, ग्राम पंचायत सदस्य आदीसह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते
यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी कोरोना लसीकरणाबाबत जिल्ह्यात सुरू असलेल्या हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत राजमोही व मेवास अंकुश .विहीर येथील लसीकरण केंद्राना भेटी देऊन तेथील लसीकरणाबाबत माहिती घेतली . गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करून लसीकरणाचे महत्व पटवून दिले. यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. पटले व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कळंबू येथे ठिबक सिंचनच्या नळया चोरणार्‍या दोघांना अटक

Next Post

शहादा येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

शहादा येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add