Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

team by team
June 28, 2026
in क्राईम
0
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठा पर्दाफाश करत तब्बल ३० लाख ३० हजार रुपये किमतीच्या ३२ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, जिल्ह्यासह इतर भागांतील अनेक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे वाहनचोरांच्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीचे विशेष पथक म्हसावद येथील चिखली फाट्यावर सापळा रचून बसले होते. त्यावेळी एका स्प्लेंडर मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे बलवान ऊर्फ अजय ज्ञानेश्वर खर्डे (रा. अंबापूर) व हिम्मतसिंग सत्तरसिंग पावरा (रा. म्हसावद) अशी सांगितली.

त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकलची इंजिन व चेसिस क्रमांकाद्वारे पडताळणी केली असता ती म्हसावद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदार **रिजवान दगडू तेली (रा. कुबेर नगर, म्हसावद) याच्यासह अनेक ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

चौकशीत आरोपींनी चोरीच्या मोटारसायकली नातेवाईक, मित्र व ओळखीच्या व्यक्तींकडे ठेवून दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तींना संपर्क करून वाहने पोलीस ठाण्यात आणण्यास सांगितले. त्यानंतर विविध व्यक्तींकडून एकामागून एक २१ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यामध्ये रॉयल एनफिल्ड, यामाहा आर-१५, एमटी-१५, होंडा युनिकॉर्न, होंडा शाईन, बजाज पल्सर, हिरो स्प्लेंडर, एचएफ डिलक्स, फॅशन प्रो आदी महागड्या दुचाकींचा समावेश आहे.

याच दरम्यान आरोपी हिम्मतसिंग पावरा याने आपल्या राहत्या घराजवळ आणखी पाच चोरीच्या मोटारसायकली लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्याच्या नातेवाईकाकडून त्या पाचही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

दरम्यान, आरोपी रिजवान तेली यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत म्हसावद येथील सरदार पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मागील झाडाझुडपांत आणखी पाच मोटारसायकली लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या पाचही दुचाकी जप्त केल्या.

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण ३२ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची एकत्रित किंमत ३० लाख ३० हजार रुपये इतकी आहे. जप्त वाहनांपैकी काही वाहनांवरील इंजिन किंवा चेसिस क्रमांक खोडण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच काही वाहने नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले असून इतर जिल्ह्यांतील गुन्ह्यांचीही पडताळणी सुरू आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधिक्षक अशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोहेकॉ जितेंद्र पाडवी, मुकेश तावडे, विशाल नागरे, सुनिल येलवे, अभय राजपूत, मनोज महाजन, रामेश्वर चव्हाण, विनोद पाटील, सचिन सैंदाणे आदींच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

Next Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add