Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

team by team
June 28, 2026
in क्राईम
0
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी-

नवापूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुमारे ५ लाख २० हजार रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू तसेच ३० लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ३५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.

दि. २६ जून रोजी पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की, सुरत येथून विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे जाणाऱ्या एका कंटेनरमधून विविध साहित्याच्या पार्सलमध्ये लपवून प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक केली जात आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर येथील कृणाल हॉटेलजवळ नाकाबंदी करण्यात आली.

रात्री सुमारे २ वाजता आरजे-१९ जीके-१९६३ क्रमांकाचा कंटेनर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये २.२० लाख रुपये किमतीचा मेजबान जाफरानी जर्दा, ३ लाख रुपये किमतीची सुगंधी तंबाखू आणि ३० लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा कंटेनरvअसा एकूण ३५.२० लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून जप्त केलेला तंबाखू महाराष्ट्रात प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर नवापूर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी कंटेनर चालक कायमुद्दीन खान सुलतानखान (वय २२, रा. श्यामपूर, जि. बाडमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

Next Post

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

Next Post
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add