नंदुरबार | प्रतिनिधी
सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या असली गावचा भगतसिंग रामसिंग वळवी या मॅरेथॉनपटूचे पुरेशा सुविधा नसतानाही स्वतःच्या मेहनतीवर अहमदाबाद मध्ये दुसर्या क्रमांकानंतर लोणावळा येथे प्रथम क्रमांक पटकावला.
भगतसिंग रामसिंग वळवी रा.असली,ता.धडगाव या २१ वर्षीय तरुणाने पर्याप्त सुविधा व पाठबळ नसतानाही स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर भारतातील सर्वात वेगवान खुल्या श्रेणीतील मॅरेथॉन मध्ये पदार्पण करून मॅरेथॉन धावपटू होण्याचा मान सातपुड्याला मिळवून दिला आहे. ५ डिसेंबर रोजी लोणावळा येथे भगतसिंगने टाटा अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये ३५ किलोमीटर गटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

लोणावळा येथे टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये ५० व ३५ किलो मीटर अशा दोन गटांमध्ये आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स फेडरेशनची मान्यता प्राप्त मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात भगतसिंग वळवी तरुणांने ३५ किलोमीटर गटांमध्ये सहभाग घेऊन पहाटे ३:३० वाजता सुरू झालेल्या मॅरेथॉनमध्ये थंडीचा व धुक्याचा सामना करत डोंगर माथ्यावरील तीव्र चढ-उताराचा खडतर प्रवास करुन ३५ किलोमीटर अंतर २ तास १८ मिनिटात पार करत मॅरेथॉन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आयपीएस कृष्ण प्रकाश यांनी भगतसिंग वळवी यांना ट्रॉफी व २५ हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरव केला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अदानी मॅरेथॉनमध्ये ४२ कि.मी. गटातून दुसरा क्रमांक
गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अदानी मॅरेथॉनमध्ये भगतसिंग वळवी यांनी ४२.२ किलोमीटर गटातून सहभाग घेतला होता. हि स्पर्धा २ तास ३३ मिनिटात पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला होता. लांबचा प्रवास व योग्य आहारा अभावी शारीरिक त्रासामुळे प्रथम क्रमांक हुकल्याची खंत भगतसिंग वळवी यांनी व्यक्त केली होती. या स्पर्धेतून रोप्य पदक व ५५ हजार रुपये रोख बक्षीस त्यांना मिळाले होते.

लहानपणापासून धावपटू होण्याची जिद्द
भगतसिंग रामसिंग वळवी हे मूळचे धडगाव तालुक्यातील असली गावचे रहिवासी आहे त्यांचं दहावीपर्यंतचे शिक्षण असली येथील आश्रम शाळेत झालं आहे. त्यानंतर दोंडाईचा व पदवीचे शिक्षण जळगाव येथे पूर्ण केल्यानंतर एम. ए. पॉलिटिक्स प्रथम वर्षासाठी पी. के. पाटील कॉलेज नंदुरबार येथे शिक्षण घेत आहे. भगतसिंग हे इयत्ता चौथीत शिकत असतानाच त्यांचे वडील वारले होते, आई – तीन बहिणी व तीन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही शिक्षणाबरोबरच विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागातून योगदान दिले आहे. लहानपणापासून धावपटू होण्याची जिद्द मनात कायम ठेवत स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर भगतसिंगने भारतातील खुल्या प्रथम श्रेणीतील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन धावपटू होण्याचा मान मिळवला आहे. असली गावचे ॲड. के. सी. पाडवी आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री असतानाही आम्हाला पाहिजे तेवढी मदत मिळाली नसल्याची खंतही भगतसिंग यांनी व्यक्त केली आहे.

मित्रपरिवार यांची आर्थिक मदत
आतापर्यंत झालेल्या विविध स्पर्धेमध्ये भगतसिंग यांना त्यांचे मित्र व सहकार्यांनी पाठबळ दिले आहे. विशेष म्हणजे साक्री तालुक्यातील उमरफाटा येथील रहिवासी आकेश कुवर (विपरो कंपनी अभियंता मुंबई) व नवापुर तालुक्यातील चितवी गावचे रहिवासी मणिलाल गावित ( धावपटू नवी मुंबई पोलीस) यांच्या मोलाचं आर्थिक साह्याने भगतसिंग वळवी यांना मदत झाली आहे.

असली जि.नंदुरबार हुन लोणावळा येथे दोन दिवसाचा प्रवास करून टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेतील ३५ किलोमीटर गटातून मी सहभाग नोंदवला अत्यंत खडतर डोंगर माथ्यावरील तीव्र चढ-उताराचा व थंडी आणि धुक्याचा सामना करत स्पर्धेत मी प्रथम क्रमांक मिळवला. आयोजकांकडून स्पर्धेचे अत्यंत चांगले नियोजन होते. मी महाराष्ट्रातील सर्वात अतिदुर्गम भागातील रहिवासी असून देखील एवढ्या मोठ्या स्पर्धेत सहभाग घेऊन मला यश मिळाले याबद्दल मी आयोजक व मला मदत करणार्या सर्व मित्र परिवारांचे आभार मानतो.
भगतसिंग रामसिंग वळवी, धावपटू