Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्मित हॉस्पीटल व रोटरी नंदनगरीतर्फे २०० विद्युत कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

team by team
December 4, 2021
in आरोग्य
0
स्मित हॉस्पीटल व रोटरी नंदनगरीतर्फे २०० विद्युत कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

नंदूरबार l प्रतिनिधी

येथील स्मित हॉस्पिटल, विद्युत वितरण कंपनी मर्यादित आणि रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत महावितरणच्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरीचे पूजनाने झाली. या शिबिरात विद्युत वितरण कंपनीच्या सुमारे २०० कर्मचारी तसेच त्यांच्या परिवाराच्या सदस्यांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमास विद्युत महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता खासने, सहा. अभियंता अक्षय मुने, शाखा अभियंता ए.टी.पाटील, श्रीमती राळेगावकर, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड, सचिव अनिल शर्मा आदी उपस्थित होते. शिबिरात स्मित हॉस्पिटलच्या माध्यमातून मेडिसिन विभाग, जनरल सर्जरी विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, गायनॅस्टीक विभाग, दंतचिकित्सा विभाग, आणि ऑफथेलमिक विभाग यांच्या माध्यमातून विद्युत वितरण कंपनीचे  सुमारे २०० कर्मचारी तसेच त्यांच्या परिवाराच्या सदस्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्युत महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता संजय पाटील म्हणाले की, एक अद्ययावत मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नंदुरबार शहरात स्मितच्या माध्यमातून उपलब्ध झाले. स्मित हॉस्पीटलने कोरोना काळात केलेल्या कार्याचा गौरव केला. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना अपघात समयी किंवा आरोग्याचा प्रश्न उद्भवल्यास मोठी समस्या निर्माण होत होती. परंतू स्मित हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेली ही सोय आणि त्यातून उपलब्ध झालेल्या सेवा सुविधा अत्यंत मोलाच्या आहेत. यावेळी विद्युत वितरणच्यावतीने शशिकांत गुरव यांनी आपल्या मनोगतात सांगितले, कॅशलेस सुविधाच्या आम्हा कर्मचार्‍यांना कसा फायदा होईल, याचा स्वतः अनुभव घेतल्यानंतर स्मित हॉस्पिटलकडून मिळालेल्या सेवा सुविधांचा बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच संदीप शिंपी म्हणाले की, वितरण कंपनीच्यादृष्टीने कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे आणि त्यातून कॅशलेस सुविधा आज स्मित हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे, सर्व कर्मचार्‍यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गौरव तांबोळी यांनी केले. डॉ.विजय पाटील यांनी या शिबिरातून कोणत्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत, याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले. तर आभार डॉ.अविनाश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्मित परिवारातील डॉ.रोहित पटेल, डॉ.कल्पेश चौधरी, निलेश तवर, शब्बीर मेमन, भरत पटेल, रोटरी परिवारातील इसराइल सय्यद, फकरोद्दीन जलगुनवाला आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई , 2 वाहन चालकांचे परवाने 6 महिण्यांसाठी तर 5 वाहन चालकांचे परवाने 3 महिण्यासांठी निलंबीत

Next Post

‘कोविड- 19’ मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी पोर्टलवर अर्ज सादर करावेत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post
रूमाल मास्क म्हणून वापराल तर बसेल दंड, नंदूरबार जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची जाहीर केली नियमावली

‘कोविड- 19’ मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी पोर्टलवर अर्ज सादर करावेत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add