Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई , 2 वाहन चालकांचे परवाने 6 महिण्यांसाठी तर 5 वाहन चालकांचे परवाने 3 महिण्यासांठी निलंबीत

team by team
December 4, 2021
in क्राईम
0
नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई , 2 वाहन चालकांचे परवाने 6 महिण्यांसाठी तर 5 वाहन चालकांचे परवाने 3 महिण्यासांठी निलंबीत

नंदूरबार l प्रतिनिधी
वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई , 2 वाहन चालकांचे परवाने 6 महिण्यांसाठी तर 5 वाहन चालकांचे परवाने 3 महिण्यासांठी निलंबीत करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत असे निदर्शनास आले की , मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ होत आहे ही बाब चिताजनक असल्यामुळे दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरुध्द् नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विशेष मोहिमेचे दि. 24 ऑक्टोंबर रोजी आयोजन करण्यात आले होते . सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत चारचाकी व दुचाकी मोटार सायकल चालकांची अचानक तपासणी केली असता काही वाहन चालकांनी मद्यपान केलेले आढळून आले . त्यामुळे त्यांचे विरुध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले . त्यामध्ये प्रामुख्याने नवापूर पोलीस ठाणे 7 , शहादा पोलीस ठाणे 5 , शहर वाहतूक शाखा , नंदुरबार – 5 नंदुरबार तालुका पोलीस ठाणे 4 , नंदुरबार शहर पोलीस ठाणे -4 , धडगांव पोलीस ठाणे 4 , अक्कलकुवा पोलीस ठाणे -3 . विसरवाडी पोलीस ठाणे -2 , सारंगखेडा पोलीस ठाणे 2 , तळोदा पोलीस ठाणे 2 , उपनगर पोलीस ठाणे 2 , मोलगी पोलीस ठाणे 1 म्हसावद पोलीस ठाणे – 1 , असे एकुण 42 गुन्हे मद्यपी चालकांवर नोंदविण्यात आले . तसेच त्यांचे परवाने निलंबीत करण्याची प्रक्रीया नंदुरबार जिल्हा पोलीसांकडून करण्यात आली होती . त्या अनुषंगाने दि. 3 डिसेंबर रोजी उप – प्रादेशीक परिवहन अधिकारी , नंदुरवार यांनी 42 पैकी दारु पिवुन वाहन चालविणारे , अतिवेगाने वाहन चालविणारे व इतर कारणांमुळे 2 वाहन चालकांचे परवाने 6 महिण्यांसाठी तर 5 वाहन चालकांचे परवाने महिण्यासाठी रद्द केलेले आहेत . तसेच उर्वरीत वाहन चालकांचे परवाने निलंबीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे . याशिवाय आगामी सण उत्सवाच्या काळात देखील नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अचानक दुचाकी व चारचाकी वाहन चालकांची तपासणी करून दारु पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक , अति वेगाने वाहन चालविणारे वाहन चालक , सरकारी नोकरांवर हल्ला करणारे इसम , अवैध धंद्यांसाठी वाहनांचा वापर करणारे वाहन चालक आढळून आल्यास त्यांचेवर कडक कारवाई करुन त्यांचे वाहन परवाने निलंबीत करण्यात येतील असे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले . दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये , दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठी देखील धोकेदायक आहे . नागरीकांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे , तसेच कोणीही मद्यपान करून वाहन चालवू नये असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फ करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार आगारातून 25 दिवसानंतर पोलीस बंदोबस्तात पहिली बस धुळ्यासाठी रवाना

Next Post

स्मित हॉस्पीटल व रोटरी नंदनगरीतर्फे २०० विद्युत कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

Next Post
स्मित हॉस्पीटल व रोटरी नंदनगरीतर्फे २०० विद्युत कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

स्मित हॉस्पीटल व रोटरी नंदनगरीतर्फे २०० विद्युत कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add