नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबारातून पाच लाखाची बोलेरो लंपास केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञाताविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार शहरातील मोठा मारूती मंदिराजवळ राहणार्या दिपक डोंगर कोळी यांची पाच लाख रूपये किंमतीची बोलेरोप्लस (क्र.एम.एच.३९- जे.५४५९) ही नंदुरबार शहरातील डी.आर.हायस्कुलजवळील मार्केट जवळील गेटजवळ लावली असता अज्ञात चोरटयांनी गाडी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी दिपक कोळी याच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि प्रतापसिंग मोहिते करीत आहेत.