नंदुरबार l प्रतिनिधी
जगात भारतीय संविधान सर्वोत्कृष्ट संविधान आहे. संविधान गौरव दिवस दि. 26 नोव्हेंबर पुरता मर्यादित न ठेवता वर्षभर साजरा करण्यात यावा. असे प्रतिपादन खा. डॉ. हिना गावित यांनी भारतीय संविधानाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त अर्हत प्रतिष्ठान नंदुरबार च्यावतीने कोरीट नाका परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.


संविधान दिनाचे औचित्य साधुन अर्हत प्रतिष्ठान नंदुरबारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खा.डॉ.हिना गावीत पुढे आपल्या संबोधनात संविधानाची महती समजावुन सांगतांना सांगितले की, आज मी जे काही आहे ते बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आहे. ओबीसी, एस.सी., एस.टी. आणि इतरांना जे प्रतिनिधित्व करता आले, ते संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीमुळेच म्हणून त्या म्हणाल्या की, भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून त्याची वर्षभर जनजागृती झाली पाहिजे. त्यात समाजातील सर्व स्तरातील जबाबदार घटकांनी आपला सहभाग नोंदविला पाहिजे असे प्रतिपादन केले.

दरम्यान कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.हिना गावीत तसेच जि.प.सदस्या डॉ.सुप्रिया गावीत यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तथा संविधानाचे पुजन करून केले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक सुभाष पानपाटील यांनी प्रमुख पाहुणे डॉ.हिना गावीत व डॉ.सुप्रिया गावीत यांचा सत्कार केला. नंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
दरम्यान एस.ए.मिशन हायस्कुल इ.१० वी ची विद्यार्थिनी पुजा वसावे हिने संविधानाबद्दल तिचे मत व्यक्त केले. कॉ.अमोल पगारे यांनी संविधान हे प्रत्येक भारतीयासाठी लिहिले गेले आहे. म्हणून संविधान जागविण्याची व जनजागृतीच्या माध्यमातुन सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम भारतीय म्हणून सर्वांचे आहे. या जबाबदारीची जाणीव उपस्थितांना करुन दिली.
सदर कार्यक्रमाला राम साळुके, स्वरुप बोरसे, सुरेंद्र ठाकरे, प्रविण वाघ, डी.के.नेरकर, संजु रगडे, मोहन खानवाणी, जितेंद्र पवार, ॲड.सुनिल जाधव, बापू साळवे, संतोष शिरसाठ, कमल कडोसे, ललित सुर्यवंशी, किरण गवळे, सुनिल महिरे, बिरारी आप्पा, चंद्रकांत भोई, माणिक माळी, राहुल रामराजे, रणविर पेंढारकर, भैय्या पिंपळे, श्याम साळुके, प्रविण मराठे, दिपक पेंढारकर, तुकाराम चित्ते, हेमंत बोरसे, दक्षा बैसाणे, रोजी बैसाणे, वंदना साळुके, संजीवनी महाले-बैसाणे, ज्योती साळुके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.हर्षबोध बैसाणे, गणेश शिरसाठ, गणेश पवार, अंतराज गवळे, युसुफ पिंजारी, गौतम पानपाटील, सिद्धार्थ साळुके, सौरभ साळुके, अशोक खांडेकर, जितेंद्र खवळे, विजय खवळे, छोटू सोनवणे, दिनेश तेजी, जयपाल तमायचेकर आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक सुभाष पानपाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन अर्हत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी केले.









