Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यातील कोरोना काळात मृत्यु झालेल्यांची संख्या शासनाच्या नोंदणीपेक्षा १० पट अधिक : खा . डॉ . हिना गावित

team by team
November 27, 2021
in राजकीय
0
नंदूरबार जिल्ह्यातील कोरोना काळात मृत्यु झालेल्यांची संख्या शासनाच्या नोंदणीपेक्षा १० पट अधिक : खा . डॉ . हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार मध्ये कोरोना काळात मृत्यु झालेल्यांची शासनाची अधिकृत संख्या ही प्रत्यक्षात एकुण मृतांच्या संख्येचा १० पट आहे . मात्र स्वतःच अपयश लपवायला हे आकडे बदलेले गेले .
केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला . कोरोनाकाळात तर मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची जोरदार स्पर्धाच सुरु होती , हे आमच्या जिल्ह्यात आम्ही पाहिल होत . विस्कळीत कारभारामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे . असे असताना प्रत्येक अपयशावर पांघरुण घालत केंद्र सरकारकडे बोटे दाखविणाऱ्या ठाकरे सरकारला या काळात गरीबांसाठी मिळालेली मदतही लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यात अपयश आले , असा आरोप भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा नंदुरबारच्या खा . डॉ . हिना गावित यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे .
महाराष्ट्रातील कोरोना अपयशाचा पंचनामा करतांना त्या म्हणाल्या की , कोविडकाळात या सरकारने महाराष्ट्रास वाऱ्यावर सोडून संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलुन दिली हे मी माझ्या डोळ्यांनी आमच्या आदिवासी जिल्ह्यात बघितले . रेमडेसीवीरसारख्या औषधांचा काळाबाजार , ऑक्सिजनचा तुटवडा , लस वाटपातील वशिलेबाजी व साठेबाजी , दर्जेदार आरोग्य सुविधांचा अभाव हे सर्व सुरुच होत आणि सरकार मात्र शांत होत . केंद्र सरकारने महाराष्ट्राला गव्हासाठी पावणेदोन हजार कोटी , तांदळासाठी दोन हजार ६२० कोरोनाच्या विळख्यातून सावरला कोटी , डाळींसाठी १०० कोटी , स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी १२२ कोटी अशी एकूण ४५ ९२ कोटींची मदत केवळ अन्नधान्यासाठी केली . गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आखली , तसेच राज्यातील ८६ हजारांहून अधिक शेतकरी , विधवा , दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना थेट मदतीच्या रूपाने तीन हजार ८०० कोटींची रक्कम बँक खात्यांत जमा केली . ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा एक पैसादेखील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही . केंद्राकडून मिळणारी मदत लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यातही ठाकरे सरकारला अपयश आल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली . आपत्ती निवारण निधीतून केंद्राने दिलेल्या दोन हजार कोटींच्या निधीतून कोणत्या उपाययोजना केल्या , याचा हिशेब जनतेस द्या , असे आव्हानही त्यांनी दिले . नंदुरबार मध्ये कोरोना काळात मृत्यु झालेल्यांची शासनाची अधिकृत संख्या ही प्रत्यक्षात एकुण मृतांच्या संख्येचा १० पट आहे . मात्र स्वतःच अपयश लपवायला हे आकडे बदलेले गेले . प्रशासनावर कोणताही अंकुश सरकारचा नाही हे देखील या काळात पाहायला मिळाले . काही अधिकाऱ्यांनी मनमानी करत तर रेमेडीसीवीरच्या काळाबाजारात साथ दिली . ऑक्सीजनचा तुटवडा असतांना देखील जिल्ह्यात ऑक्सीजन भरपुर असल्याचे भासवुन जनतेची दिशाभुल केली गेली , असाही गंभीर आरोप खा . गावित यांनी केला . कोरोनाकाळात केंद्राकडून महाराष्ट्राला मिळालेली मदत कोरोनाच्या गंभीर महामारी लढण्यासाठी राज्यांना सक्षम करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यांच्या हाती निधी जास्तीत जास्त कसा खेळता राहील आणि राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलली . मात्र मविआ सरकारने नेहमीच स्वतःच्या अपयशाचे खापर केंद्रावर फोडले . महाराष्ट्राबाबत दुजाभाव करत केंद्राकडून राज्याला मदत मिळत नाही असा कांगावा करून अपयश झाकण्याची स्पर्धा सुरू झाली . नाहक सर्वसामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला , म्हणुनच , महाराष्ट्राला केंद्राकडून किती मदत मिळाली याचा हा पुरावा . ही आकडेवारी पाहिल्यावर तरी सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या मदतीची जाहीर कबुली द्यावी असे आव्हान देखील खा . डॉ . गावित यांनी दिले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर, भाजपातर्फे होणार सत्कार

Next Post

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post
शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add