नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार येथील कोकणीहिल परिसरात एका हॉटेलमध्ये कोरोनाचे नियम तोडून ग्राहकी सुरू असल्याच्या कारणावरून हॉटेल सील केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील कोकणीहिल परिसरात असलेली श्याम सुंदर नावाची हॉटेल उघडे ठेवून नाका तोंडावर कोणतेही मास्क अथवा कपडयाचा उपयोग न करता विनामास्क हॉटेल चालू ठेवून खाद्य पदार्थांची विक्री करतांना पोलीसांना आढळून आला. हॉटेलमध्ये इसमांना बसण्यास मनाई असतांना ७ ते ८ इसमांना हॉटेलमध्ये बसू दिले. यामुळे याबाबत पो.कॉ.विशाल राजेंद्र मराठे यांच्या फिर्यादीवरून कुणाल यशवंत मोरे रा.देसाईपुरा कुंभारगल्ली (नंदुरबार) याच्या विरूध्द भादंवि कलम २६८, २६९, २९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची सूचना पालिकेला करण्यात आल्याने पालिकेने कोकणीहिल परिसरातील हॉटेल श्यामसुंदर सील केले. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ वसंत वसावे करीत आहेत.