नंदुरबार | प्रतिनिधी
भाजपाचे १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदन देण्यात आले
या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना-कॉंग्रेस-राष्टवादी या आघाडी सरकारने तालीबानी पध्दतीने लोकशाही मुल्य पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन केले आहे. हे सर्वस्वी लोकशाही मुल्यांच्या विरोधात आहे. वास्तविकताः १२ आमदारांची कुठल्याही प्रकारची चूक नसतांना अश्या पध्दतीने एक वर्षासाठी निलंबन करणे अन्यायकारक आहे. ओबीसींच्या प्रश्नांवर लोकशाहीच्या मार्गाने विधानसभेच्या कायप्रणाली प्रमाणे जनतेच्या हक्कासाठी आवाज उठविणार्या आमदारांना तब्बल एका वर्षासाठी निलंबनाची कार्यवाही इंग्रजी जुल्मी राजवटीची आठवण करून देते. या निवेदनाव्दारे आम्ही मागणी करीतो की, १२ आमदारांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे अन्यथा जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही असा ईशारा यावेळी देण्यात आला.यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील,शहराध्यक्ष नरेंद्र माळी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी,जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, संजय साठे आदी उपस्थीत होते.