Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षक पात्रता परीक्षेत १ हजार १६५ भावी शिक्षकांची दांडी

team by team
November 21, 2021
in शैक्षणिक
0

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील ३२ परीक्षा केंद्रांवरे आज झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ११ हजार ५२ परीक्षार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होते.दरम्यान पहिल्या पेपरला ६८७ परीक्षार्थी तर दुसर्‍या पेपरला ४७८ परीक्षार्थी असे एकुन १ हजार १६५ परीक्षार्थी अनुपस्थित होते.
नंदुरबार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ ( MAHATET – २०२१ ) चे आयोजन आज रविवार रोजी करण्यात आले होते . नंदुरबार शहरातील ३२ परीक्षा केंद्रांवर एकूण ११ हजार ५२ परीक्षार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होणार होते . परीक्षा आयोजनासाठी गठित जिल्हा संनियंत्रण समितीच्या प्रमुख जिल्हाधिकारी मनिषा खत्री तसेच सहप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . राहुल चौधरी तसेच उपशिक्षणाधिकारी डॉ . युनूस पठाण यांनी केले .  सकाळ सत्र व दुपार सत्र अशा दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात येऊन पेपर क्र १ ला १९ परीक्षा केंद्रांवर ६ हजार ९१ परीक्षार्थीपैकी एकूण ५ हजार ४०४ परीक्षार्थी उपस्थित राहिले असून ६८७ परीक्षार्थी अनुपस्थित होते . पेपर क्रमांक १ ला ८८.७२ टक्के परीक्षार्थ्यांनी उपस्थिती दिली आहे . पेपर क्र २ ला १३ परीक्षा केंद्रांवर ४ हजार ९६१ परीक्षार्थीपैकी एकूण ४ हजार ४८३ परीक्षार्थी उपस्थित राहिले असून ४७८ परीक्षार्थी अनुपस्थित होते . पेपर क्रमांक २ ला ९०.३६ टक्के परीक्षार्थ्यांनी उपस्थिती दिली आहे . प्राचार्य डायट डॉ . जगराम भटकर तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . राहुल चौधरी यांनी भरारी पथकाची जबाबदारी पार पाडली असून गटशिक्षणाधिकारी आर . आर . देसले , शेखर धनगर , धनराज राजपूत , आर . बी . चौरे , भावेश सोनवणे यांनी झोनल अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे . जिल्हा परिरक्षक म्हणून सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आर.बी. पाटील यांनी कामकाज पार पाडले . परीक्षा केंद्रांवरील कामकाजाचे संनियंत्रण करण्यासाठी विस्तार अधिकारी शिक्षण आणि केंद्रप्रमुख यांना सहाय्यक परिरक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली होती . जिल्हा नियंत्रण कक्षाचे प्रमुख म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉ . युनूस पठाण कामकाज पार पाडले असून परीक्षा समितीचे सहनियंत्रक म्हणून त्यांना नेमणूक देण्यात आली होती . परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस प्रशासनाने चोखपणे पार पाडले आहे . परीक्षेच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे एस . एन . पाटील , एम . आर . निकुंभ , पी . के . पवार , आसिफ पठाण , इसरार सैय्यद , सुनिल गिरी , महेंद्र अहिरे , योगेश रघुवंशी , मयुर वाणी व रविंद्र बच्छाव यांनी परिश्रम घेतले .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लुटले

Next Post

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा मोर्चा २५ नोव्हेंबरला मंत्रालयावर धडकणार

Next Post

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा मोर्चा २५ नोव्हेंबरला मंत्रालयावर धडकणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add