नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील सहारा टाऊन सिटी जवळील देवचंद नगरातील चोरट्यांनी दिवसा घरफोडी करत ६ लाख ७२ हजार ३०० रूपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.शहरात एकाच दिसात दोन घरफोड्या झाल्याने नागरीक भयभित आहेत.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील सहारा टाऊन सिटी जवळील देवचंद नगरात राहणार्या रजनी सुरेश मंगळे हे घरी नसतांना दि. दि.१० नोव्हेंबर रोजी सकाळी११ ते सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयंानी कुलुप तोडुन घरात प्रवेश करीत २० हजार रूपये रोख व ६ लाख ८२ हजार ३०० रूपये किंमतीचे सोने चांदिचे दागिने असा एकुन ६ लाख ७२ हजार ३०० रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला.याप्रकरणी रजनी सुरेश मंगळे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई हेमंत मोहिते करीत आहेत.