नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार – खांडबारा स्त्यावरील वाटवी जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली . त्यात एक तरुण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
खांडबारा स्त्यावरील वाटवी जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली . या अपघातात
ईश्वर परशुराम कोकणे रा.झामट्यावळ ता.नवापूर याचा जागीच मृत्य झाला. तर श्रावण वळवी ( रा.डोकाऱ्या ) हा गंभीर जखमी झाला . खांडबारा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यास नंदुरबार शासकीय रुग्णालयात हलवले . घटनेची माहिती मिळताच खांडबारा पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार विश्वास गावित , पोलिस भूषण चित्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य केले . परशुराम कोकणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला . पुढील तपास विसरवाडीचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील मार्गदर्शनाखाली सुरु आहे.








