नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरातील डोंबे गल्लीत राहणाऱ्या धनगर समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन युवाशक्ती अहिल्या सेनेतर्फे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आले.
युवाशक्ती अहिल्या सेनेच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रतिभा संजय धनगर यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंढरपूर शहरात धनगर समाजातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला या प्रकरणी मुख्य आरोपी सह सहकार्य करणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शासन करण्यात यावे. पीडितेच्या कुटुंबीयांकडून फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी असे निवेदनात म्हटले आहे घटनेस विलंब करून गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्यात यावी. तसेच सदर खटला जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून चालविण्यात यावा आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. वर पीडितेच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे सदर प्रकरणातील दोषींवर कठोर शासन व्हावे अन्यथा नंदुरबार सर्व राज्यभर रस्त्यावर उतरून युवाशक्ती अहिल्या सेनेतर्फे आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनावर प्रदेशाध्यक्षा प्रतिभा धनगर, लता संजय हिवराळे, विनोद दीपक धनगर, रंजना वाघ, मंगला जाधव, निर्मला गायकवाड, रामकृष्ण मोरे ,दत्तू धनगर, बारकू शिरोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.










